- पैठणी हाफचड्डी या जाहीरातीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून ती ट्रेंडिंगमध्ये आहे
- जाहीरातीमधील पैठणीचा अपमान झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला
- या जाहीरातीवर आता उपहासात्मक टिका होताना दिसत आहे
सध्या बाजाराज एक जाहीरात चांगलीच व्हायरल होत आहे. शिवाय ही जाहीरात ट्रेंडींगमध्ये ही आहे. मात्र या जाहीरातीमुळे सोशल मीडियावर एकच धुमाकूळ सुरू झाला आहे. ही जाहीरात आहे पैठणी हाफचड्डीची म्हणजे पैठणी 'पैठणी Shorts'ची. पारंपारीक वस्त्र पण मॉडर्न स्टाईलमध्ये अशी या जाहीरातीची टॅग लाईन आहे. ही जाहीरात सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय त्यावर टीकेची ही झोड उठली आहे. पैठणीचा असा अपमान केला जात यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार किळसवाणा असल्याचं ही म्हटलं आहे.
प्रसाद देशपांडे यांनी या जाहीरातीचं एक पोस्टर आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. त्या खाली ते म्हणतात खण आणि नारळ आणला नाही नशीब, नाहीतर गुलाल बुक्क्याचा कार्यक्रमात ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकावा लागला असता! त्यातही थोर नशीब म्हणजे किमान मोर योग्य ठिकाणी ठेवलाय! पैठणीची पत तर घालवलीच, पण नाच रे मोरा आंब्याच्या वनात ह्या उत्तम गाण्याची पत ही घालवलीत ह्यांनी! आता नवीन उखाणा मार्केटमध्ये येणार असा टोला ही त्यांनी लगावला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक जण व्यक्त झाले आहेत.
एका युजर्सने म्हटलं आहे की दळभद्री लोक! पैठणी आणि नथ अशा खानदानी गोष्टींची पार वाट लावलीय या दळभद्री लोकांनी. पैठणीच्या टोप्या काय, डगले काय, चड्ड्या, पिशव्या, करून महावस्त्राची पार रया घालवली आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने तर यांना आवरा असं म्हटलं आहे. तर जुन्या साड्या फेकण्यापेक्षा एखाद्या ब्रँडची वाट लावायला काय हरकत आहे असं एकाने म्हटलं आहे. एक युजर्स म्हणतो असं काही असेल असं वाटत नाही. हे एआयचं काम असावं असं त्यांनी म्हटलं आहे.
पण या निमित्ताने ही 'पैठणी Shorts' चर्चेत मात्र नक्की आली आहे. ती कुठे भेटणार, त्याची विक्री कशी होणार याचा उल्लेख सध्या तरी या पोस्टरवर दिसत नाही. पण पैठणी सारख्या वस्त्राची अशी अवस्था केली जात आहे हे पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत. यात मग जुने जाणते ही आहेत. शिवाय तरुणांनी ही या कृतीचा निषेध केला आहे. काहींना हा फेक पणा वाटत आहे. असं जरी असलं तरी पैठणी सारख्या वस्त्राचं नाव मात्र या माध्यमातून खराब होत आहे अशी भावना ही काहींनी व्यक्त केल्या आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world