Gray Whale Viral Video: जर तुम्ही शांत समुद्रात सर्फिंग एन्जॉय करत असाल आणि अचानक तुमच्या समोर महाकाय व्हेल मासा आला, तर काय होईल?याचा विचारही केला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.सॅन फ्रान्सिस्कोच्या क्रिसी फिल्ड समुद्र किनाऱ्यावरही अशाच प्रकारची खतरनाक घटना घडली.याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
अचानक समोर आला व्हेल मासा
सॅन फ्रान्सिस्कोचं प्रसिद्ध क्रिसी फील्ड बीच,समोर अलिशान गोल्डन गेट ब्रिज आणि समुद्रातील एक कार्गो शिप..नजारा एकदम फिल्मी होता. एरिक क्रेमर्स नावाचा एक विंडसर्फर लाटांचा आनंद लुटत होता, पण त्यांना जराही अंदाज नव्हता की क्षणातच त्यांचा सामना भल्या मोठ्या व्हेल माशासोबत होणार आहे. ज्यावेळी व्हेल मासा समोर आला, तेव्हा एरिक बोट घेऊन पुढे निघाला, त्यावेळी तो व्हेल मासा पाण्यातून वर आला आणि त्यांची जोरदार टक्कर झाली.
Video obtained by KTLA's sister station https://t.co/0KphrMviOR appears to show a windsurfer colliding with a whale in the San Francisco Bay. https://t.co/ciwXHDYxvX pic.twitter.com/YDRem5RPaj
— KTLA (@KTLA) March 30, 2026
नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?
दोघांची धडक इतकी भीषण होती की, एरिक खेळण्यासारखा हवेत उडाला आणि थेट पाण्यात पडला. एवढ्या मोठ्या अपघातानंतरही एरिकचा जीव वाचला.त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा अनुभव शेअर करत म्हटलंय की, त्यांनी सतर्क राहून बोटचा वेग आधीच कमी ठेवला होता. पण शेवटच्या क्षणी व्हेल मासा अचानक खवळला.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर गाड्यांची थरारक रेसिंग, नागरिकांचा जीव धोक्यात, व्हिडीओ व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world