Bedroom Shocking Video : गुवाहाटीच्या पंजाबारी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला बेडमध्ये (पलंग) बंद करून लपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना पंजाबारी येथील जुरिपारमधील हाऊस नंबर 69 मध्ये घडली. या ठिकाणी अमरीन अख्तर लस्कर नावाच्या महिलेच्या घरी जिल्हा श्रम टास्क फोर्सने छापेमारी केली.स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई रविवारी सायंकाळी एका मजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्यात आली.
त्या घरात नेमकं काय घडलं?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी मागील सहा वर्षांपासून घरगुती काम करायची.त्यानंतर तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केले जात होते. छापेमारीची माहिती मिळताच आरोपी महिलेने मुलीला जवळपास 25 मिनिटे पलंगाच्या आत बंद करून ठेवले.
नक्की वाचा >> BOSS ला गंडवलं, ऑफिसमध्ये Netflix पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने केला भन्नाट जुगाड, आजूबाजूच्या कोणालाही कळलंच नाही
...अखेर सत्य समोर आलं
जिल्हा श्रम टास्क फोर्समधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा अधिकाऱ्यांची टीम त्या घरात पोहोचली तेव्हा घरमालकीण अरिना लस्कर खातून हिने मुलगी घरात नसल्याची खोटी माहिती दिली. मुलीचे वडीला तिला तीन-चार दिवसांपूर्वी घेऊन गेले आहेत, असं त्या महिलेनं सांगितलं. मात्र, घरातील संशयास्पद हालचाली पाहून टीमने घराची तपासणी करण्याची मागणी केली अन् धक्कादायक प्रकार समोर आला.