अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO

Python Viral Video: व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अजस्त्र अजगरला पकडून कारमधून बाहेर काढताना दिसत आहे. पुढे जे काही घडले ते पाहून अंगावर येईल काटा...

जाहिरात
Read Time: 2 mins
कारमध्ये शिरला महाकाय अजगर

Python Viral Video: मस्तपैकी तयार होऊन तुम्ही फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहात आणि कारच दरवाजा उघडताच आतमध्ये सहा फुट लांब व भयानक अजगर दिसला तर? साध्या विचारानंही भीती वाटते ना...पण असेच काहीसे दृश्य एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. एक व्यक्ती अजस्त्र अजगर अशा पद्धतीने कारमधून बाहेर काढत, जसे की तो शेतजमिनीमध्ये अडकलेला पाइप खेचून काढतोय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की या व्यक्तीला ना त्या महाकाय अजगराची भीती वाटत आहे, ना त्याला बाहेर खेचून काढताना होणाऱ्या परिणामांची चिंता आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजगरसोबत रशीखेच  (Snake Found In Car Engine)

'Mahdi Laith'नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. कारमध्ये एक महाकाय अजगर सीटवर बसल्याचे दिसत आहे. गाडीच्या आतील भागामध्ये तो शिरला होता. कारचा दरवाजा उघडताच चालकाला अक्षरशः घाम फुटला. पण हा तरुण ज्या पद्धतीने अजगराला पकडून बाहेर खेचून काढतोय, ते पाहून कोणालाही धक्काच बसेल. चालकाने अजगराची शेपूट पकडून सर्व ताकदीनिशी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण काही केल्या अजगर बाहेर येईना. अखेर जमिनीवर बसून सर्व ताकद लावून त्याने अजगराला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला आणि अखेर महाकाय प्राणी कारबाहेर पडला.  

नक्की वाचा: प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर दिलेल्या चित्र-विचित्र प्रतिक्रिया (Python In Car)

सोशल मीडियावर या व्हिडीओला 10 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच नेटकरी या व्हिडीओवर चित्र-विचित्र प्रतिक्रिया व्यक्त करतानाही दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे की,"अजगराला कार आवडली आहे, म्हणून त्याला बाहेर पडायचे नाही. दुसऱ्या युजरने म्हटले की," हे भगवान, माझ्या अंगावर तर काटाच आला". आणखी एका युजरने लिहिले आहे की, "मला असे वाटते की त्याला ड्रायव्हिंग करणे पसंत आहे, पण सापांसाठी लायसेन्सच नसते".

(नक्की वाचा:  बापरे! या ज्वालामुखीतून बाहेर येतंय लाखोंचं सोनं, कुठे आहे ठिकाण?)

VIDEO: डरकाळ्या फोडणारा बिबट्या आणि रेस्क्यू ऑपरेशनचा थरार