जाहिरात
Story ProgressBack

प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video

Viral Video:वधूकडील मंडळी तिचे अपहरण करत असताना लोक त्यास विरोध करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही नाट्यमय घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Read Time: 2 min
प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video

Viral Video:आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पूर्वी गोदावरी जिल्ह्यामध्ये लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये चित्रविचित्र घटना घडल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, वधुच्याच कुटुंबीयांनी भररिसेप्शन पार्टीमध्येच तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एक व्यक्ती गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वधूकडील मंडळींनी मुलाच्या कुटुंबीयांवर लाल-तिखटाची पावडर फेकून हल्ला देखील केला. 

एकाच कॉलेजमध्ये शिकत होते जोडपे

गंगावरम स्नेहा आणि बत्तिना वेंकटानंदु यांची भेट आंध्र प्रदेशातील नरसरावपेट जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये झाली. हे दोघंही Veterinary Science या विषयामध्ये डिप्लोमा करत होते. दोघांमध्ये सुरुवातीस मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 13 एप्रिल रोजी विजयवाडा येथील प्रसिद्ध दुर्गा मंदिरामध्ये दोघांनी लग्न केले.

(नक्की वाचा: कराडमध्ये 24 तासांत 2 हत्या, आरोपींनी मारहाणीचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर केले शेअर)

लग्नगाठ बांधल्यानंतर नवरामुलगा पत्नीला घेऊन स्वतःच्या घरी आला. मुलाच्या घरातील मंडळींनी मुलीचा स्वीकार केला. त्यामुळेच नवऱ्यामुलाच्या कुटुंबीयांनी 21 एप्रिलला दोघांच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्याचे ठरवले. या कार्यक्रमामध्ये स्नेहाच्या कुटुंबीयांनीही निमंत्रण देण्यात आले. जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व गोष्टींचे नियोजन सुरू होते, त्याच दरम्यान स्नेहाची आई आणि अन्य नातेवाईकांनी पाहुण्यांवर लाल तिखटाची पावडर फेकून हल्ला केला. इतकंच नव्हे तर स्वतःच्याच लेकीचा अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. 

(नक्की वाचा: EXCLUSIVE : 'आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू...' CM शिंदेंच्या भेटीनंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया)

पण नवरामुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी यास विरोध केला व वधूचा अपहरणाचा डाव हाणून पाडला. घटनास्थळावर झालेल्या झटापटीमध्ये नवऱ्यामुलाच्या कुटुंबातील सदस्य वीरबाबू गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. त्यांना राजामहेंद्रवरम सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत स्नेहाने म्हटले की, "माझी आई, भाऊ आणि चुलत भावाने माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि पाहुण्यांवर मिरची पावडर देखील फेकली".

दरम्यान, मुलीकडील मंडळींचा या लग्नास विरोध का होता? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

VIDEO: BJP खासदार Ramdas Tadas अडचणीत?,निवडणुकीआधी सूनेचे गंभीर आरोप 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination