- झांबियाच्या विद्यार्थिनीसाठी भारतातील अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच जीवनातील अनुभवही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत
- भारतातील चहा हा केवळ पेय नाही तर सामाजिक संवाद आणि आपुलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे
- ऑटो-रिक्षा चालविणे आणि बाजारात बार्गेनिंग करणे यांसारख्या गोष्टी तिने भारतात राहून आत्मसात केल्या आहेत
Jamibian Student In India: अभियांत्रिकी शिक्षणासाठी भारतात आलेल्या झांबियाच्या एका विद्यार्थिनीसाठी शिक्षणा इतकाच इथला जीवनप्रवासही रंजक ठरला आहे. मर्सी जो (@mercy_jo123) नावाच्या या तरुणीने सोशल मीडियावर शेअर केलेले अनुभव सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतात चहा हे केवळ एक पेय नसून तो इथल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हे तिला उमजले आहे. तिने आपले भारतात आलेले वेगवेगळे अनुभव शेअर केले आहेत. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मर्सी जो मते, भारतात सकाळी उठल्यापासून ते मित्रांना भेटण्यापर्यंत प्रत्येक प्रसंगात चहा केंद्रस्थानी असतो. "कोणी चहासाठी विचारले, तर त्याला नकार देणे सोपे नसते," असे ती सांगते. भारतीय लोकांमधील आपुलकी आणि संवाद साधण्याची पद्धत चहाच्या टपरीवरच फुलते, हे तिला प्रकर्षाने जाणवले. अभ्यासाच्या तणावापेक्षा इथल्या 'टी-कल्चर'ने तिला जास्त काही शिकवले. टी कल्चर भारताचे एक कल्चकच म्हणायला हवे असं ही ती सांगायला विसरत नाही.
भारतात राहताना तिला ऑटो-रिक्षाची सवारी सुरुवातीला भीतीदायक वाटली होती. पण आता तिला त्याची सवय झाली आहे. भारतीय बाजारपेठांमधील 'बार्गेनिंग' म्हणजेच घासाघीस करण्याचे कौशल्यही तिने आता आत्मसात केले आहे. सुरुवातीला लोक कुतूहलाने बघायचे, पण नंतर तिला समजले की हे लोकांचे प्रेम आणि जाणून घेण्याची ओढ आहे. इथल्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या खाऊगल्ल्या पाहून ती थक्क झाली आहे. त्यामुळे भारत तिच्यासाठी एक वेगळा अनुभव देणारा ठरला आहे. भारत आपल्याला भावाला असं ही ती सांगते.
काय शिकली मर्सी?
- 1. चहाचे महत्त्व: भारतात चहा ही केवळ सवय नसून मैत्री जोडण्याचे माध्यम आहे.
- 2. बाजारपेठ: भारतीय बाजारपेठेत किमती कमी कशा करून घ्यायच्या, हे तिने शिकले.
- 3. खाद्यसंस्कृती: मसाल्यांचा वापर आणि रात्री उशिरापर्यंत मिळणारे अन्न तिला खूप आवडले.
तिच्या मते, एका नवीन देशात राहण्यासाठी खुले मन आणि शिकण्याची इच्छा असणे गरजेचे आहे. भारताने तिला इंजिनिअरिंगपेक्षा 'जगणे' अधिक शिकवले आहे. तिने तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर असंख्य कमेंट्स आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world