VIDEO: साक्षात मृत्यू पाहिला!वादळात पत्र्याच्या शेडसोबत अनेक फूट उंच उडाला तरुण, निसर्गाचं तांडव कॅमेऱ्यात कैद

Bareilly Storm Viral Video: उत्तर प्रदेशात आलेल्या भीषण वादळात 101 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बरेलीमध्ये एक तरुण पत्र्याच्या शेडसोबत हवेत उडाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Viral Video: बरेलीतील वादळात अनेक फूट उंच उडाला तरुण"

Strong Storm in UP: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बुधवारी (13 मे) संध्याकाळी आलेल्या वादळाने प्रचंड नुकसान झाले. या जोरदार वादळात झाडे तर पडलीच, पण घरेही कोसळली. दरम्यान वादळाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण पत्र्याच्या शेडसोबत अनेक फूट उंचावर फेकला गेला होता. हा व्हिडीओ बरेलीच्या भमोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बमियाना गावातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे हवेत उडाल्यानंतर नन्हे नावाचा तरुण जखमी झाला.

जमिनीवर पडल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे वादळ किती धोकादायक होते, याचा अंदाज व्हिडीओवरून लावला जाऊ शकतो. वारा इतक्या वेगाने वाहत होता की हा तरुण पत्र्याच्या शेडसोबत बराच वेळ हवेतच होता.  

Advertisement

(नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: ना बस,ना रिक्षा! फक्त 150 रुपयांचा जुगाड, इंधन बचतीचा 'संभाजीनगर पॅटर्न' एकदा वाचाच)

बरेलीसह संपूर्ण उत्तर प्रदेशात वादळामुळे अनेकांचा मृत्यू

बरेलीमध्ये वादळामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याचा परिणाम बुधवारी संपूर्ण उत्तर प्रदेशात दिसून आला, जिथे जोरदार वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे आणि विजेचे खांब पडणे, घरे कोसळणे यासह अन्य अपघातांमध्ये 101 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 पेक्षा जास्त लोक झाले आहेत. बरेलीमध्येही चार जणांचा मृत्यू झाला आहे.

(नक्की वाचा : Shocking जिम ट्रेनरने 80,000 उकळले, इंजेक्शनमुळे रक्तपुरवठा थांबला अन् हाड सडलं; नितंबावर झाला हा गंभीर परिणाम)

उत्तर प्रदेशातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झाला मृत्यू

प्रयागराज: 21 जणांचा मृत्यू
भदोही: 18 जणांचा मृत्यू
मिर्झापूर: 15 जणांचा मृत्यू
फतेहपूर: 10 जणांचा मृत्यू
उन्नाव, बदायूं: प्रत्येकी 6 जणांचा मृत्यू
प्रतापगड, बरेली: प्रत्येकी 4 जणांचा मृत्यू
सीतापूर, रायबरेली, चंदौली: प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू
कानपूर देहात, हरदोई, संभल: प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू
कौशांबी, शहाजहानपूर, सोनभद्र, लखीमपूर: प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू