30 फूट खोल नाल्यातील विचित्र आवाज, डोकावल्यानंतर लोकांना बसला धक्का; पोलीस आल्यानंतर...

30 फूट खोल नाल्यातून स्थानिकांना चित्रविचित्र आवाज ऐकू येत होता. याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पुढे जी काही माहिती समोर आली, त्याने पोलिसांनाही धक्का बसला.

Advertisement
Read Time: 2 mins

उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अलिकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना परिसरातील 30 फूट खोल नाल्यातून चित्रविचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. नाल्यातून येणाऱ्या आवाजामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर तपासादरम्यान त्यांना जे काही पाहायला मिळाले, ते दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला.  

(नक्की वाचा: VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?)

30 फूट खोल नाल्यात अडकला होता तरुण

नोएडामध्ये नशेच्या अवस्थेत असलेला एक तरुण 30 फूट खोल नाल्यामध्ये पडला होता. सांडपाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहत जाऊन पाइपमध्ये अडकला आणि यातून बाहेर पडणे त्याला शक्य नव्हते. पाइपमध्ये अडकलेला हा तरुण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडता होता.

दरम्यान नाल्यातून येणाऱ्या विचित्र आवाजाचे नेमके प्रकरण आहे काय? हे पाहण्यासाठी  घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नाल्यात डोकावून पाहिले असता नाल्याच्या पाइपमध्ये एक व्यक्ती अडकलेला दिसला. यानंतर पोलिसांच्या पथकाने स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केले आणि अखेर अथक मेहनत केल्यानंतर तरुणाला वाचवण्यात यश आले.

(नक्की वाचा: नवऱ्याला भरमंडपात रडू आवरेना, एका फुलपाखरामुळे बदलले वातावरण; कारण समजल्यास तुम्हीही व्हाल भावुक)

पाहा व्हिडीओ

Advertisement

पोलिसांच्या कामगिरीला सलाम

सच्चे हिरो म्हणत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे स्थानिकांनी कौतुक केले. हा व्हिडीओ पोलिसांनी आपल्या uppolice या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी म्हटले की, स्थानिकांनी 112 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नशेत असणारा तरुण 30 फूट खोल नाल्यामध्ये अडकल्याची माहिती दिली. यानंतर तातडीने नोएडा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि स्थानिकांच्या मदतीने तरुणाला वाचवलं. दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 9 हजारहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. एका युजरने कमेंट केले आहे की, 'पोलीस आणि स्थानिक दोघांनीही मिळून चांगले काम केले आहे.  

(नक्की वाचा : पतीसोबत झाले कडाक्याचे भांडण, पत्नीने दिव्यांग मुलाला फेकले मगरींच्या तोंडी; कारण...)

VIDEO:पुण्याची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरात? पाहा काळजाचा ठोका चुकवणारी बातमी