जाहिरात

नवऱ्याला भरमंडपात रडू आवरेना, एका फुलपाखरामुळे बदलले वातावरण; कारण समजल्यास तुम्हीही व्हाल भावुक

Viral Video: लग्नसमारंभादरम्यान पाहुणेमंडळींसमोरच नवऱ्यामुलाला अश्रू अनावरण... नेमके काय घडले? पाहा व्हिडीओ...

नवऱ्याला भरमंडपात रडू आवरेना, एका फुलपाखरामुळे बदलले वातावरण; कारण समजल्यास तुम्हीही व्हाल भावुक

Viral Video: लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. मग वधू असो किंवा वर, दोघांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही आनंदी भावना पाहायला मिळतात. पण काही वेळेस खुलले चेहरे देखील आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आठवणीने उदास होतात. असेच काहीसे दृश्य या व्हायरल व्हिडीओमध्येही पाहायला मिळाले. स्वतःच्या लग्नामध्ये हा तरुण ओक्साबोक्शी रडताना दिसला. नवऱ्यामुलाला रडताना पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की असे नेमके काय घडले? ज्यामुळे तो स्वतःच्याच लग्नामध्ये इतका रडतोय.

नेमके काय घडले?

काही ठिकाणी लग्नसमारंभादरम्यान भाषण करण्याची पद्धत असते, हा क्षणही वधू-वरासाठी खास असतो. हा तरुण देखील स्वतःच्या लग्नसमारंभामध्ये भाषणाद्वारे भावना व्यक्त करत होता आणि अचानक त्याला रडू कोसळले. त्याच्या रडण्यामागील कारण होते एक छोटेसे फुलपाखरू... फुलपाखरामुळे रडण्यासारखे इतके काय घडलं? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल...  तर यामागील कारणही आपण जाणून घेऊया...

(नक्की वाचा: ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती)

फुलपाखराला पाहून रडू आवरेना

'शांघाय डेली' नावाच्या इंस्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सुंदर पद्धतीने सजवलेल्या स्टेजवर हा तरुण उभा असल्याचे आपण पाहून शकता. त्याच्या शेजारी पांढऱ्या रंगाचा सुंदर ब्रायडल ड्रेस परिधान केलेली वधू देखील दिसत आहे, जी त्याच्यासोबत पुढील सात जन्मांकरिता लग्नगाठ बांधणार आहे. पाहुणेमंडळींनीही मोठ्या संख्येने त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या सर्वांसमोर नवरामुलगा भाषण देत असतानाच पांढऱ्या रंगाचे एक फुलपाखरू आले आणि त्याच्या कोटवर बसले. त्या फुलपाखराला पाहिल्यानंतर हा तरुण ढसाढसा रडू लागला. 

(नक्की वाचा: स्वातंत्र्याची भावुक करणारी कहाणी, 50 वर्षे रुग्णालयात असणाऱ्या भावासाठी ताईचा संघर्ष)

पाहा व्हिडीओ

भावनिक कारण 

फुलपाखराला पाहून रडण्यामागील कारण देखील अतिशय खास व भावनिक होते. ज्याचा उल्लेख तरुणाने आपल्या भाषणादरम्यान केला. जवळपास वर्षभरापूर्वीच या तरुणाच्या आजीचे निधन झाले. त्याने अशी प्रार्थना केली की, "आजी तुझे माझ्यावर प्रेम असेल आणि तुला माझी आठवण येत असेल तर माझ्या लग्नामध्ये फुलपाखरू होऊन ये". यानंतर पुढे जे काही घडले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे भाषण सुरू असतानाच एक पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू तेथे आले आणि त्याच्या कोटवर बसले. हा निव्वळ योगायोग होता आणि यानंतर नवऱ्यामुलाला रडू आवरलेच नाही. 

(नक्की वाचा: अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO)

VIDEO: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं उभारलं हरित मतदान केंद्र | NDTV Marathi
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
चारधाम यात्रेचं 2 दिवसात कोसळलं नियोजन, हा Video आहे गंभीर इशारा
नवऱ्याला भरमंडपात रडू आवरेना, एका फुलपाखरामुळे बदलले वातावरण; कारण समजल्यास तुम्हीही व्हाल भावुक
Gulabi Sadi Trending Song reel in Mumbai Local Train Video Goes Viral
Next Article
'गुलाबी साडी...' गाण्यावर तरुणाचा लोकलमध्ये भन्नाट डान्स, 6.4 कोटी जणांनी पाहिलेला VIDEO पाहिला का?