जाहिरात
This Article is From Aug 04, 2024

गर्लफ्रेंडसोबत खोलीत होता पोलीस अधिकारी, बायकोनं पकडलं आणि....

पोलीस इंस्पेक्टर त्याची गर्लफ्रेंड असलेल्या प्रभारी इंस्पेक्टरसोबत एका खोलीत पकडला गेला.

गर्लफ्रेंडसोबत खोलीत होता पोलीस अधिकारी, बायकोनं पकडलं आणि....
मुंबई:

पोलीस अधिकाऱ्याची त्याच्या पत्नीनं जोरदार धुलाई केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस इंस्पेक्टर त्याची गर्लफ्रेंड असलेल्या प्रभारी इंस्पेक्टरसोबत एका खोलीत पकडला गेला. प्रेमी इंस्पेक्टरची पत्नी आणि तिच्याबरोबरचे काही जण त्या इंस्पेक्टरचा शोध पोलीस स्टेशनमधील त्या खोलीत पोहोचले होते. आपल्या नवऱ्याचं अफेयर सुरु आहे, असा संशय त्या महिलेला बऱ्याच काळापासून होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ही महिला खोलीत पोहोचली तेव्हा तिचा संशय खरा ठरला. नवऱ्याला परस्त्रीसोबत पाहून संतापलेल्या महिलेनं त्या दोघांना मारहाण सुरु केली. महिलेसोबत आलेल्या लोकांनीही त्यांना मारहाण केली. यावेळी त्या दोघांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण, संतप्त लोकांनी काहीही ऐकलं नाही. त्यांना बेदम बदडलं. उत्तर प्रदेशातल्या आग्रामध्ये हा प्रकार घडला आहे. 

महिलेनं तिच्या नवऱ्याची जोरदार धुलाई केली. मी दोन वर्षांपासून त्रस्त आहे. तुम्ही दुसऱ्यांंचं आयुष्य बरबाद केलंय, असं ही महिला यावेळी ओरडत होती. हा सर्व प्रकार सुरु होता त्यावेळी अन्य पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते. पण, त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. 

( नक्की वाचा : बदलापूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या 'चादर गँग'चा पर्दाफाश )

पोलिसांनी केली कारवाई

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महिला इंस्पेक्टरला निलंबित करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: