Most Expensive Train In India: भारतीय रेल्वे म्हटलं की गर्दी आणि धक्काबुक्की डोळ्यांसमोर येते, पण जरा थांबा... नाण्याची दुसरी बाजूही पाहा! येथे 'पॅलेस ऑन व्हील्स' यासारखी शाही सफर देणाऱ्या ट्रेन देखील आहेत, जेथे पाऊल ठेवताच रेड कार्पेट आणि फुलांच्या वर्षावाने तुमचे स्वागत केले जाते. या ट्रेनचा थाटमाट असा आहे की, मोठमोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्सची चमकही फिकी पडेल. येथील सुइट्समध्ये 'विनियर वुड' आणि 'गोल्डन मिरर'चे असे काम केले आहे की, तुम्हाला आपण एखाद्या मुघल सम्राटाच्या महालात आलो आहोत असे वाटेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता तुम्ही या चालत्या-फिरत्या हवेलीमध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग' देखील करू शकता; म्हणजे राजस्थानची सफरही होईल आणि लग्नाचे सात फेरेही एकाच वेळी पार पडतील.
कोट्यवधींचा खर्च आणि राजेशाही थाट (Maharajas Express Ticket Price)
ट्रेनच्या सजावटीसाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मेक्सिकन फॅब्रिकपासून ते आलिशान स्पा आणि गिझरपर्यंत, प्रत्येक गोष्ट इथला 'क्लास' अधोरेखित करते. 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही ट्रेन मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही रुळांवर धावत आहे. पाहुण्यांना उन्हाची झळ बसू नये म्हणून उदयपूरची थंडाई, जयपूरची कुल्फी आणि जैसलमेरमध्ये खास थंड सरबत देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जात आहे.
(नक्की वाचा: Bank PO First Payslip Viral: बँक POची पहिली सॅलरी स्लिप व्हायरल! इन-हँड पगार आणि भरघोस भत्ते पाहून बसेल धक्का)

Photo Credit: maharajas_express
(नक्की वाचा: Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण?)
ट्रेनच्या तिकिटाबाबत सांगायचे झाले तर तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. या शाही प्रवासाच्या एका केबिनचे भाडे 10 लाख रुपयांपासून सुरू होऊन 23 लाख रुपये इतके आहे. इतक्या किमतीत छोट्याशा शहरामध्ये हक्काचा बंगला येईल.
सात रात्रींचा प्रवास आणि लाखो रुपयांचे भाडे (7 Nights Journey and Lakhs of Ticket Price)
सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 7 रात्री आणि 8 दिवसांच्या या टुअररमध्ये दिल्लीपासून आग्रा आणि राजस्थानच्या कोनाकोपऱ्याची सफर घडवून आणली जाते. गंमत म्हणजे तिकीट इतके महागडे असतानाही या ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नाही. परदेशी पाहुणे आणि एनआरआय (NRI) अनेक महिने आधीच आपली सीट बुक करतात. पॅलेस ऑन व्हील्स ही केवळ ट्रेन नसून भारताची शान आणि राजेशाही थाटाचे जिवंत उदाहरण आहे. ट्रेनच्या तिकिटाची किंमत एखाद्या घरासारखी असली, तरी तिचा अनुभव एखाद्या स्वप्नवत दुनियेसारखा आहे.
(डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारावर दिली आहे. NDTV याची पुष्टी करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world