जाहिरात

Viral News: 70 वर्ष जुन्या बंगल्याची विक्री! नानावटींच्या 'या' ऐतिहासिक बंगल्याची किमत माहित आहे का?

जुहू तारा रोडवरील हा सी-फेसिंग बंगला त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो.

Viral News: 70 वर्ष जुन्या बंगल्याची विक्री! नानावटींच्या 'या' ऐतिहासिक बंगल्याची किमत माहित आहे का?
  • जुहू तारा रोडवरील ७० वर्षे जुन्या ऐतिहासिक लीला बंगल्याची तब्बल २२१ कोटी रुपयांमध्ये विक्री झाली आहे
  • हा बंगला IIB श्रेणीचा हेरिटेज दर्जा प्राप्त असून मूळ आर्ट डेको शैलीतील संरचना जपली जाणार आहे
  • नानावटी कुटुंबाने हा बंगला विकून मुंबईतील महागड्या मालमत्तांमधील सर्वात मोठा व्यवहार पूर्ण केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी कायम असल्याचे चित्र जुहू येथील एका मोठ्या व्यवहारातून समोर आले आहे. जुहू तारा रोडवरील 70 वर्षे जुना आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेला ऐतिहासिक 'लीला बंगला' विकला गेला. हा ऐतिहासिक बंगला तब्बल 221 कोटी रुपयांना विकला गेला आहे. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक गौतम नानावटी आणि त्यांच्या कुटुंबाने या मालमत्तेची विक्री केली आहे. मुंबईतला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे. 

या बंगल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याला लाभलेला 'IIB' श्रेणीचा हेरिटेज दर्जा आहे. आर्ट डेको शैलीत बांधलेल्या या बंगल्याच्या मूळ संरचनेत नवीन मालकाला मोठे बदल करता येणार नाहीत हे विशेष आहे. 1,355 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या वास्तूत 8,480.68 चौरस फुटांचे बिल्ट-अप क्षेत्र, तर 5,000 चौरस फुटांची विस्तीर्ण बाग आहे. बंगला विक्री झाल्यामुळे हा अलिशान बंगला आता नानावटी कुटुंबाची संपत्ती राहाणार नाही.  

नक्की वाचा - Bollywood History: 1 बंगला, 3 सुपरस्टार, 3 जणांना ही केलं उद्ध्वस्त, 'शापित' बंगल्याची रहस्यमय कहाणी

हा व्यवहार 'नोटनदास रिअॅलिटी'ने पूर्ण केला आहे. नोटनदास ज्वेलर्सचे संचालक महेश जगवानी आणि हर्ष जगवानी यांनी हा बंगला खरेदी केला आहे. या व्यवहारासाठी कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्यात आले आहे. बर्मा टीक लाकडाचे कोरीव काम असलेले दरवाजे या बंगल्याच्या सौंदर्यात भर घालतात. प्रत्येकाला हवा हवा असलेला हा बंगला शेवटी दगवानी यांनी खरेदी केला आहे. अन्य काही इच्छुकांनी हा बंगला खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. पण व्यवहार फायनल होत नसल्याची माहिती ही समोर येत आहे. 

नक्की वाचा - Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक

मुंबईच्या ग्लॅमरस जुहू परिसरात सध्या एका आलिशान बंगल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलच्या मालकांचा जुना आणि देखणा 'लीला बंगला' आता नव्या मालकाच्या ताब्यात गेला आहे. तब्बल 221 कोटी रुपयांना हा व्यवहार झाला असून मुंबईतील महागड्या घरांच्या यादीत याची नोंद झाली आहे. प्रसिद्ध 'नोटनदास ज्वेलर्स' समूहाचा भाग असलेल्या नोटनदास रिअॅलिटीने हा बंगला विकत घेतला आहे. महेश जगवानी आणि त्यांचा मुलगा हर्ष जगवानी यांनी या 70 वर्षे जुन्या वारसा लाभलेल्या वास्तूसाठी मोठी किंमत मोजली आहे. जुहू तारा रोडवरील हा सी-फेसिंग बंगला त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो.

काय आहे बंगल्यात खास?

  • क्षेत्रफळ: सुमारे 1,355 चौरस मीटरचा प्लॉट.
  • टेरेस: 2,500 चौरस फुटांचे मोकळे टेरेस.
  • बाग: घरासमोरच 5,000 चौरस फुटांची सुंदर बाग.
  • काष्ठशिल्प: बर्मा टीक लाकडाचे अतिशय सुबक कोरीव काम असलेले दरवाजे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com