Viral News: नाताळनिमित्त प्रत्येकजण सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहत असतात, सीक्रेट सांताकडून गिफ्ट घेण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अमेरिकेतील एका व्यावसायिकालाही नेटकरी रिअल लाइफ सांता म्हणतायेत. कारण त्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी कामगिरी केलीय. ग्रॅहम वॉकरने स्वतःची कंपनी विकण्यापूर्वी त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना या विक्री व्यवहारातून थेट फायदा झाला पाहिजे, अशी अट घातली होती.
तब्बल 2,100 कोटी रुपयांचा बोनस
रिपोर्टनुसार, कंपनीच्या विक्री व्यवहारातून एकूण रक्कमेचा 15 टक्के भाग म्हणजे जवळपास 2,157 कोटी रुपयांचं कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. यानुसार कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला जवळपास 3.7 कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. कर्मचारी कंपनीसोबत जोडलेला राहिला तर पाच वर्षात ही रक्कम दिली जाईल.
उद्योगपतीने का घेतला बोनस देण्याचा निर्णय?
कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाने प्रेरित होऊन बोनस दिल्याचा निर्णय घेतल्याचे ग्रॅहम वॉकरने सांगितलं. कित्येक कर्मचारी कठीण काळातही कंपनीसोबत राहिले, त्यांच्या याच निष्ठेचा सन्मान करायचा होता. जून महिन्यापासून बोनस पेमेंट देण्यास सुरुवात झालीय. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना यावर विश्वास बसला नाही.
(नक्की वाचा: Viral Video: मॅम तिला मारू नका, कारण... वडिलांचे बोलणं ऐकून लेक रडू लागली अन् वर्गातही पसरली शांतता)
कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदलअनेक कर्मचाऱ्यांनी या पैशांचा वापर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला. काहींनी गृहकर्ज फेडले, काहींनी कर्जाचं ओझं कमी केलं तर काहींनी मुलांच्या कॉलेज फी भरली. 1995 पासून कंपनीत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यानं स्वतःचे बुटीक उघडण्याचे स्वप्न पूर्ण केले.
(नक्की वाचा: Viral News: स्वर्गही पाहिला, नरकातील भयंकर किंकाळ्याही ऐकल्या...11 मिनिटांसाठी मेली आणि पाहून आली दुसरं जग)
हे पाऊल का मानलं जातंय खास?सामान्यतः कंपनी विकल्यानंतर भागीदारांना बोनस मिळतो, पण या प्रकरणात कर्मचाऱ्यांना नफा देण्यात आला, या कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे शेअर्सही नव्हते. म्हणूनच कंपनीच्या मालकाचे पाऊल खरे नेतृत्व आणि मानवतेवरील विश्वासाचे आदर्श उदाहरण असल्याचे म्हटलं जातंय