Viral news: प्रेयसीसह तिच्या आईलाही केलं प्रेग्नेंट, यूट्युबरचा दावा, सत्य समोर येताच...

प्रेयसी आणि तीची आई या दोघी ही आपल्या मुळे प्रेग्नेंट झाल्या आहेत. त्यांच्या होणाऱ्या बाळाचा बाप आपणच असल्याचा दावा त्याने केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

एक अशी घटना समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही काय तर संपूर्ण जग चक्रावून गेलं आहे. अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध YouTuber ने आपली प्रेयसी प्रेग्नेंट असल्याची माहिती सोशील मीडियावर दिली. पण खरी बातमी पुढे होती. प्रेयसीची आई ही प्रेग्नेंनंट असल्याचं त्याने सांगितलं. पण खरा धक्का त्याने पुढे दिला. तो म्हणाला प्रेयसी आणि तीची आई या दोघी ही आपल्या मुळे प्रेग्नेंट झाल्या आहेत. त्यांच्या होणाऱ्या बाळाचा बाप आपणच असल्याचा दावा त्याने केला. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर जोरादार व्हायरल झाली. आई आणि मुलगी एकाच वेळी प्रेग्नेंट कशा काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. अनेकांनी टीका केली. त्यानंतर मात्र सत्य का आहे हे या युट्युबरनं सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निक यार्डी हा अमेरिकेतल्या फ्लोरीडातील मोठा यूट्युबर आहे. त्याचं वय 29 वर्ष आहे. त्याचे जवळपास 3.4 मिलीयन सबस्क्रईबर्स आहेत. गेल्या महिन्यात त्याने एक व्हिडीओ आपल्या चॅनेलवर पब्लिश केला होता. त्यात त्याने त्याची 22 वर्षीय प्रेयसी जेड ही प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. पण त्याच वेळी त्याने तिची 44 वर्षीय आई दानी ही पण गर्भवती असल्याचे सांगितले. शिवाय त्या दोघी आपल्यापासूनच प्रेग्नेंट असल्याचा दावा त्याने या व्हिडीओत केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sad Ending: आता ती भारतात कधीच परतणार नाही, दुबईत त्या लेकीसोबत काय झालं?

बरं हे तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्याबाबतचा एक व्हीडिओ ही शुट केला आहे. त्यात यार्डी बरोबर जेड आणि दानी या ही दिसत आहेत. त्यात त्या गर्भवती असल्याचे ही स्पष्ट दिसत आहेत. ज्यावेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या. आई आणि मुलगी एकाच वेळी एकाच व्यक्तीपासून कशा प्रेग्नेंट राहिल्या असा प्रश्न विचारला गेला. काहींनी तर यावर टीकाही केली. अशा स्थितीत यार्डी,  जेड आणि दानी यांना सत्य काय ते त्यांच्या चाहत्यांना शेवटी सांगावेच लागले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - देहविक्रय करणाऱ्या तरुणीच्या जीवनावरील चित्रपटाने ऑस्करमध्ये रचला इतिहास; OTT वर कुठे पाहता येईल?

यावर यार्डी याने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात तो म्हणतो की ही जी प्रेग्नेंन्सीची स्टोरी आहे ती रचली गेलेली खोटी स्टोरी आहे. त्यात कुठले ही तथ्य नाही. हा एक ड्रामा होता. त्याचा उद्देश मनोरंजन करणे हेच होतं. त्यामुळे त्या दोघी ही प्रेग्नेंट नाहीत हेच सत्य आहे असे त्याने स्पष्ट केले आहे. मात्र या दोन्ही महिलांना आपण दोन वर्षापासून अगदी जवळून ओळखत असल्याचा दावा ही त्याने केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय?

यार्डी हा मुळचा जमैकाचा आहे. त्याने 2017 पासून आपल्या सोशल मीडिया करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तो आपल्या महिला सहकारी आणि प्रसिद्ध व्यक्तीं बरोबर व्हिडीओ बनवत होता. जेड ही सुद्धा कॉन्टेन्ट क्रिएटर आहे. जेड आणि दानी यांचं नातं  मात्र आई आणि मुलगीचं आहे. दरम्यान जेडला आपण दोन वर्षापूर्वी एक व्हिडीओ शूट दरम्यान भेटलो होते. त्या पलिकडे आपले काही नाते नाही असं ही त्याने स्पष्ट केले. शिवाय त्या दोघीही प्रेग्नेंट नाही हे ही त्याने स्पष्ट केले आहे. पण त्याच्या एक व्हिडीओने अमेरिकेसह त्याच्या जगभरातल्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती.