VIDEO: राज्यपालांच्या ताफ्यामुळे गरोदर पत्नी ट्रॅफिकमध्ये अडकली; नवऱ्याने चांगलीच जिरवली, पोलिसांचीही पळापळ

Viral Video: कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांच्या ताफ्यासाठी (Convoy) वाहतूक रोखल्यामुळे बेंगळुरूमध्ये (Bengaluru) एका संतप्त वाहनचालकाने रस्त्याबाहेर उतरून थेट रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Video: बंगळुरूच्या गजबजलेल्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर 'व्हीआयपी संस्कृती'विरोधात एका सामान्य नागरिकाने थेट रस्त्यावर बसून केलेले अनोखे आंदोलन केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पोलिसांनी वाहतूक रोखल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. या व्हीआयपी ताफ्यामुळे झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममध्ये या व्यक्तीची गरोदर पत्नी अडकून पडली होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, हा संतप्त नागरिक आपल्या गाडीतून उतरला आणि थेट रस्त्याच्या मधोमध जाऊन बसला. त्याने तिथल्या ट्रॅफिक पोलिसांना अत्यंत संतप्त भाषेत जाब विचारला. त्याने म्हटलं की, "माझी पत्नी गरोदर आहे. तुम्ही हा सिग्नल का ब्लॉक केला आहे? फक्त राज्यपाल व्हीआयपी आहेत म्हणून आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणजे कोणीच नाही का? आम्हालाही आमची महत्त्वाची कामे आहेत."

Advertisement

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

30 मिनिटे ट्रॅफिक जाम

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील इस्रो जंक्शन जवळ घडली. या परिसरात आधीच अंडरपासचे काम सुरू असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यातच राज्यपालांचा ताफा जाणार असल्याने पोलिसांनी तब्बल 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सामान्य वाहने रोखून धरली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफिक पोलिसांनी त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. "तुम्हीही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहात," असे सांगत त्याला रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, सुरुवातीला त्याने उठण्यास साफ नकार दिला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तो तिथून बाजूला झाला.

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!

माजी इन्फोसिस CFO मोहनदास पै यांची 'X' वर टीका

या घटनेनंतर इंटरनेटवर व्हीआयपी संस्कृती आणि त्यामुळे महानगरांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) मोहनदास पै यांनी 'X' वर पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. ते म्हणाले, "व्हीआयपींच्या हालचालींसाठी अशा प्रकारे तासनतास ट्रॅफिक रोखण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करा. शहरातील ही व्हीआयपी संस्कृती आता बंद झाली पाहिजे आणि नागरिकांचा आदर राखला गेला पाहिजे."
 

Topics mentioned in this article