Viral Video: 'घुंघट की आड़ से...' गाण्यावर मुलांच्या टोळीनं केला असा धमाल डान्स, एक-एक अदा पाहून व्हाल फिदा

Viral Video: सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डान्स कराल. बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणं 'घुंघट की आड से...' या गाण्यावर धमाल डान्स केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Viral Video: लग्नसोहळ्यांमध्ये मित्रांचा धुमाकूळ"
kathiyawadiboyz Insta

Wedding Viral Video: लग्नसमारंभामध्ये मित्रमैत्रिणींची भूमिका काय असते?... केवळ मित्रमैत्रिणींच्या लग्नाचा क्षण खास करणे. सोशल मीडियावर असाच एक धमाकेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. मित्राच्या लग्नामध्ये काही मुलांनी असा धुमाकूळ घातला की नवरा-नवरीपेक्षा चर्चा या घुंघटवाल्या वऱ्हाड्यांची होतेय. या टोळीचा डान्स पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल.   

स्टेजवर धमाकेदार एण्ट्री, पोरांनी लुटली मैफील

व्हायरल व्हिडीओमध्ये चार-पाच मुलांनी नवऱ्यामुलीच्या मैत्रिणींप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन स्टेजवर एण्ट्री घेतली. जसं 'घुंघट की आड से…' गाणं सुरू झालं तसं सर्वांनी परफेक्ट डान्स करण्यास सुरुवात केली. त्यांची प्रत्येक अदा एखाद्या मुलीप्रमाणेच होती. चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या ठुमक्यांनी मैफील सजली. त्यांचा धमाकेदार डान्स पाहून लोक पोट धरून हसू लागले.

डान्स इतका गंमतीशीर होता की लोकांना हसू आवरलं नाही(Ghoonghat Dance Boys) 

लग्नसोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांनी टाळ्या, शिट्या वाजवून मुलांच्या डान्सचे कौतुक केले. काही लोकांनी तर हे क्षण कॅमेऱ्यामध्येही कैद केले. सर्वजण त्यांना प्रोत्साहन देत होते. इतकी ऊर्जा आणि गंमतीशीर डान्स पाहून नेटकरीही या ग्रुपचे कौतुक करत आहेत. kathiyawadiboyz नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.  

Advertisement

(नक्की वाचा: Viral News: लग्नानंतरही जोडपी वेगळं का झोपतात? नेमका काय आहे हा ट्रेंड आणि मुख्य कारण, 99% लोकांना माहीत नाही)

Advertisement

सोशल मीडियावर धुमाकूळ (Boys dance at friend wedding)

व्हायरल व्हिडीओवर नेटकरीही एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, 'यांचा डान्सच खरं आकर्षण होते, नवऱ्यामुलीच्या मैत्रिणींनाही लाज येईल'. दुसऱ्या युजरने म्हटलं की, 'लग्नामध्ये अशाच मित्रांची गरज असते'. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिलाय.