जाहिरात

VIDEO: कॉर्पोरेट जगातील 'सिक्रेट' अफेअरचा व्हिडिओ व्हायरल; नवऱ्याचा फोन येताच महिलेने कसं बदललं रूप!

Corporate Office Affair Viral Video : कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामापेक्षा 'अफेअर'चीच चर्चा जास्त असते की काय, असा प्रश्न पडण्याइतपत धक्कादायक प्रकार या तरुणीने जवळून अनुभवला.

VIDEO: कॉर्पोरेट जगातील 'सिक्रेट' अफेअरचा व्हिडिओ व्हायरल; नवऱ्याचा फोन येताच महिलेने कसं बदललं रूप!
Corporate Office Affair : कॉर्पोरेट विश्वातील अफेयर्स सांगणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Corporate Office Affair Viral Video : कॉर्पोरेट विश्वातील झगमगाट आणि कामाच्या दबावाखाली अनेकदा वैयक्तिक आयुष्यातील समीकरणे बदलताना दिसतात. सध्या एका तरुणीने सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा मेट्रोमधील अनुभव याच बदलत्या संस्कृतीवर बोट ठेवत आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामापेक्षा 'अफेअर'चीच चर्चा जास्त असते की काय, असा प्रश्न पडण्याइतपत धक्कादायक प्रकार या तरुणीने जवळून अनुभवला आणि आता तिचा तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

मेट्रोमधील तो संशयास्पद संवाद

एका तरुणीने मेट्रोतून प्रवास करताना तिच्या शेजारी बसलेल्या महिलेचे फोनवरील संभाषण ऐकले. ती महिला तिच्या ऑफिसमधील सचिन सर नावाच्या व्यक्तीशी अतिशय जवळीक साधून बोलत होती. या संभाषणात गोडवा इतका होता की कोणालाही त्यांच्यातील नात्याचा अंदाज सहज यावा. मात्र, याच वेळी त्या महिलेच्या पतीचा फोन आला आणि अचानक तिने आपला बोलण्याचा ढंग पूर्णपणे बदलला. एका क्षणात प्रियकरासाठी असलेला गोड आवाज पतीसाठी अतिशय त्रोटक आणि फॉर्मल झाला, हे पाहून शेजारी बसलेली तरुणी अवाक झाली.

कॉर्पोरेट कल्चर आणि फसवणुकीचे गणित

या संभाषणातून कॉर्पोरेट जगतातील एका छुप्या बाजूचे दर्शन घडले. सचिन सर आणि ती महिला दोघेही विवाहित असूनही एकमेकांसोबत ट्रिपला जाण्याचे नियोजन करत होते. विशेष म्हणजे, हे नियोजन इतक्या शिताफीने केले जात होते की कोणालाही संशय येऊ नये. जवळच्या ठिकाणी फिरायला जायचे जेणेकरून घरी काहीही संशय येणार नाही आणि कोणाचेही कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होणार नाही, याची काळजी ते घेत होते. 'घरी कुणाचा मूड खराब झाला, तर आपल्या चौघांचाही मूड खराब होईल', असे त्यांचे वाक्य ऐकून ही तरुणी संतापली.

( नक्की न्यूज : Trending News: 10 मुलींनंतर मुलगा झाला पण वडिलांना मुलींची नावे सांगताना का घाम फुटला? पाहा विशेष प्रतिक्रिया )

वैवाहिक नात्यावर प्रश्नचिन्ह

हा अनुभव शेअर करताना त्या तरुणीने कॉर्पोरेट संस्कृतीवर तिखट टिप्पणी केली आहे. आजूबाजूला अशा प्रकारे जोडीदाराची फसवणूक होताना पाहून आता लग्नासारख्या पवित्र नात्यावरचा विश्वासच उडाला असल्याची भावना तिने व्यक्त केली. ऑफिसमधील अशा नात्यांमुळे केवळ कामावरच परिणाम होत नाही, तर अनेक संसारही उध्वस्त होतात, असे मत तिने मांडले आहे. या व्हिडिओने कॉर्पोरेट क्षेत्रातील नैतिकतेवर पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू केली आहे.

नेटिझन्सनी ओढले ताशेरे

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजवीर नावाच्या युजरने हा 57 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 42.9 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून 1.1 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, जर लोकांनी त्यांच्या गुप्त ऑफिस रोमांसऐवजी कामावर अर्धे तरी लक्ष दिले असते, तर आज प्रत्येकजण खूप प्रगती करू शकला असता. युजर्सनी कमेंट्समध्ये या प्रकाराचा निषेध केला असून ही कॉर्पोरेट जगातील एक काळी बाजू असल्याचे म्हटले आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com