जाहिरात

VIDEO : रंगीत बॉम्ब थेट नवरीवर आदळला अन् भलतंच घडलं, 9 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडीओ

Wedding Celebration Video Went Wrong : विकी आणि पिया यांना त्यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवायचा होता. यासाठी त्याने एक खास फोटोशूटची योजना आखली होती.

VIDEO : रंगीत बॉम्ब थेट नवरीवर आदळला अन् भलतंच घडलं, 9 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडीओ
Couple Wedding Viral Video

लग्नाच्या फोटोशूटदरम्यान रंगीत फटाका थेट नवरीवर आदळल्याने ती जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. कॅनडाहून भारतात आलेल्या भारतीय वंशाच्या जोडप्यासोबत हा प्रकार घडला आहे. यामध्ये नवरी मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. विकी आणि पिया यांनी इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून लग्नात फटाके वाजवण्याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. रंगीत बॉम्ब चुकून थेट वधूवर आदळला तेव्हाचा दुःखद क्षण दाखवण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एका व्हिडीओ शॉटसाठी म्युझिकसोबत रंगीत बॉम्ब सोडण्याची योजना होती. विकी आणि पिया यांना त्यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवायचा होता. यासाठी त्याने एक खास फोटोशूटची योजना आखली होती. ज्यामध्ये त्यांच्या मागे रंगीत धूर सोडण्याचं प्लानिंग होतं. मात्र रंगीत फटाका चुकीच्या दिशेने फुटला आणि होत्याचं नव्हतं झालं. फटाका थेट नवरीवर येऊन आदळला.

पाहा व्हिडीओ

अपघातात पियाची पाठ जळाली, केसही जळाले. पियाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या पाठीवर जळण्याच्या खुणा देखील दिसत आहेत. अचानक हा सगळा प्रकार घडल्याने लग्नातील उपस्थित मंडळीही गोंधळले. पियाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जिथे उपचारानंतर ती पुन्हा लग्नाच्या समारंभात सामील होण्यासाठी परतली. मात्र लग्नसोहळ्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

(नक्की वाचा-  पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)

विकी आणि पिया यांनी या घटनेचे व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. घटना कशी घडली हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  94.8 मिलियन म्हणजे 9 कोटी 40 लाखांहून अधिक व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. काहींनी फटाके आणि रंगीत बॉम्बच्या धोक्यांबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. 

(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)

विकी आणि पिया यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "एका एपिक शॉटसाठी हे सुंदर कलर-बॉम्ब बॅकग्राउंडमध्ये उडवण्याची प्लानिंग होतं, मात्र ते बिघडलं. ही रील अशी व्हायरल होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. परंतु तुमचं प्रेम आणि सपोर्टसाठी सर्वांचे आभार. फटाक्यांमुळे किती नुकसान होऊ शकते याची जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही हे शेअर करत आहोत."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: