Viral Video: सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर अनेकदा डिलिव्हरी बॉयच्या उद्धटपणाचे, मनमानीपणाचे अनुभवही काही नेटकरी शेअर करत असतात तर काहीजण डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तींच्या संघर्षाचे, त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीचेही व्हिडिओ माध्यमांवर शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Ahilyanagar News: रात्रीच्या अंधारात पापाचा खेळ! गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क उद्ध्वस्त
व्हायरल व्हिडिओची होतेय चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, आजच्या धावपळीच्या जीवनात, लोक अनेकदा आपल्या चाव्या विसरतात किंवा दारांना कुलूप लावायला विसरतात. असाच अनुभव एका तरुणीने शेअर केला आहे. दिव्या उन्नी नावाच्या एका महिलेसोबत असेच काहीसे घडले, तिने घाईगडबडीत आपले घर उघडेच ठेवले होते. घर पूर्णपणे असुरक्षित होते आणि तिची लाडकी मांजर आत होती.
त्याचवेळी डिलिव्हरी बॉय अमजद अन्सारी घरात आला. जेव्हा अमजदने पाहिले की दरवाजा उघडा आहे आणि आजूबाजूला कोणीही नाही, तेव्हा त्याने जे केलं ते कौतुकास्पद होते. त्याच्या कृतीची आता सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. अमजदने केवळ पार्सल पोहोचवण्याचे आपले कर्तव्यच पूर्ण केले नाही, तर एक जबाबदार व्यक्ती म्हणूनही स्वतःला सिद्ध केले. त्याने घरातील सामान एका टेबलावर सुरक्षितपणे ठेवले आणि तो दारात उभा राहिला.
मालक परत येईपर्यंत तो तिथून हलला नाही. त्याला भीती होती की एखादा अनोळखी व्यक्ती घरात येईल किंवा मांजर पळून जाईल. जेव्हा दिव्या घरी परतली, तेव्हा अमजदला तिथे उभे पाहून तिला हायसे वाटले. तिने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि डिलिव्हरी कंपनीला अमजदला प्रसिद्धी देण्याची विनंती केली.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या डिलिव्हरी बॉयच्या छोट्याशा कृतीचे लोक कौतुक करत आहेत. अशा दयाळू लोकांमुळे जग अधिक सुंदर बनते असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. इंटरनेट या 'देसी हिरो'ला सलाम करत आहे आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world