Father Daughter Emotional Video Viral: सोशल मीडियावर दरदिवशी शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडीओ केवळ ट्रेंड होत नाहीत हृदयावर खोलवर छापही सोडतात. बापलेकीचा असाच एक भावुक करणारा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हिडीओमध्ये एक असहाय्य वडील आपल्या लहान मुलीसोबत शाळेतील बाकावर बसलेले दिसत आहेत. सरकारी शाळेतील ही घटना असल्याचे म्हटलं जातंय. जेथे वडील त्यांच्या लेकीचं भविष्य आणि सुरक्षिततेबाबत खूप चिंतेत दिसतायेत. यामध्ये कोणताही ड्रामा नाही, तर केवळ खऱ्या भावना आहेत, म्हणूनच नेटकरी भावुक झाले आहेत.
तिची आई नाही, वडिलांच्या थरथरत्या आवाजाने सर्वांनाच रडवलं...(Father Emotional Video for Daughter)
व्हिडीओमध्ये मुलीचे वडील शाळेच्या शिक्षकांना अतिशय नम्रपणे आणि थरथरत्या आवाजात म्हणतायेत की, "मॅडम माझ्या मुलीला मारू नका. तिची आई नाही. जर ती रडू लागली तर तिला शांत कोण करणार". त्यांच्या या वाक्याने वर्गातील वातावरण पूर्णतः शांत झालं. लेकीला अतिशय प्रेमाने-लाडाने वाढवलंय, असेही ते म्हणाले. त्यांच्या आवाजामध्ये भीती, करुणा आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून येतंय. या भावनिक क्षणाने नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्श केलाय.
(नक्की वाचा: Viral News: LGच्या जुन्या ACतून 24 कॅरेट सोनं बाहेर पडतंय? VIDEO VIRAL झाल्यानंतर लोक भंगारात शोधतायेत खजिना)
वर्गात पसरली भयाण शांतता (School Viral Video Father Pleading)
मुलीला आई नसल्याचे सांगताच वर्गामध्ये शांतता पसरली. वर्गातील लहान मुलंही देखील भावुक झाल्याचं दिसतंय. शाळेतील एक सामान्य दिवस अचानक जीवनातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक बनला. म्हणूनच हा व्हिडीओ केवळ व्हायरल व्हिडीओ नसून समाजाला विचार करायला लावणारी घटना आहे.
(नक्की वाचा: Viral News: 14 वर्षाच्या सख्ख्या भावापासून प्रेग्नेंट राहिली 16 वर्षाची बहीण, बाळ जन्मताच जे केलं ते अतिशय भयंकर)
नेटकरीही झाले भावुक (Emotional Video Viral)
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हजारो युजर्संनी या वडिलांचं कौतुक केलंय. एका युजरने लिहिलंय की, वडील केवळ वडील नसतो तर गरज भासल्यास तो आईची भूमिकाही निभावतो. एका युजरनं लिहिलंय की, जेव्हा एक वडील प्रेम करतो, त्यावेळेस आपल्या मुलांसाठी तो मजबूत कवचप्रमाणे असतो.