- दुबईत राहणाऱ्या 23 वर्षीय सूर्या गायत्रीने तिचा महिन्याचा खर्च सोशल मीडियावर शेअर केला आहे
- सूर्या दुबईत अकाउंटंट म्हणून काम करते आणि तिला कंपनीने घर दिले असल्यामुळे भाड्याचा खर्च नाही
- तिचा मासिक किती आहे हे ही तिने या व्हिडीओत सांगितले आहे
दुबई हे शहर सर्वांनाच आकर्षीत करतं. हे शहर जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. त्यामुळे तिथलं राहणे आणि तिथला खर्च परवडणे ही अनेकांसाठी मोठी गोष्ट आहे. तरी अनेक भारतीय दुबईत राहातात. प्रत्येकाची राहण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. प्रत्येकाची लाईफ स्टाईल वेगळी असेल. पण त्यांनी त्यासाठी खर्च येतो याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. दुबईत राहणाऱ्या एका 23 वर्षीय भारतीय तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने दुबईत राहण्याचा आपला महिन्याचा खर्च शेअर केला आहे. सूर्या गायत्री असे या तरुणीचे नाव आहे.
सूर्या गायत्री दुबईत अकाउंटंट म्हणून काम करते. तिने शेअर केलेला बजेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने या व्हिडीओत तिला किती खर्च येतो हे सांगितले आहे. सूर्याच्या महिन्याच्या बजेटमध्ये घराच्या भाड्याचा समावेश नाही. त्याला कारण ही तसेच आहे. कारण तिला राहण्यासाठी तिच्या कंपनीने घर दिलं आहे. त्यामुळे तो खर्च वाचला आहे. सूर्याने सांगितले की, दुबईमध्ये भाड्याने घरं घेणं खूप महाग आहे. मात्र तो खर्च तिला करावा लागत नाही.
सूर्या दुबईत ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जास्त रेस्टॉरंट्स नाहीत. त्यामुळे ती स्वतःच जेवण बनवते. किराणा मालासाठी ती दर आठवड्याला जवळपास 100 दिरहाम खर्च करते. महिन्याला तिचा ग्रोसरीचा खर्च 500 दिरहाम होतो. घरातील वाय-फाय कनेक्शनसाठी तिला दरमहा 200 दिरहाम द्यावे लागतात असं ती सांगते. सूर्याचे ऑफिस आणि घर एकाच इमारतीत असल्याने तिचा प्रवासाचा खर्च ही खूपच कमी आहे.
नक्की वाचा - Big Breaking: मोठी बातमी! 20 खासदार फुटले, वेगळा गट स्थापन, लोकसभेत समिकरण बदलणार
मेट्रो प्रवासासाठी 'नोल कार्ड' रिचार्ज आणि कधीतरी टॅक्सीचा वापर ती करते असं तिने व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे तिचा प्रवास खर्च 100 ते 110 दिरहाम इतका होतो. या शिवाय बाहेर खाणे आणि शॉपिंगसाठी ती जवळपास 200 ते 250 दिरहाम खर्च करते. इतर किरकोळ खर्च 50 दिरहाम होतो असं तिने सांगितलं आहे. या सर्वांचा विचार करता तिचा संपूर्ण महिन्याचा खर्च हा 1,100 दिरहाम म्हणजेच भारताचे 25,000 रुपये इतका येतो असं तिने सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world