Viral News: सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर लवकरच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक उमेदवार सज्ज आहेत, रणनीती आखत आहेत आणि अनेक वर्षांच्या जनसंपर्कावर जोर देत आहेत.
मात्र, याच निवडणुकीच्या काळात शॉर्टकट वापरण्याच्या नादात अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून काळी जादू किंवा जादूटोणा करण्याचे प्रकार छुप्या मार्गाने उघडकीस आले आहेत.
भक्तांचे प्रश्न सोडवणारे' महाराज
या सगळ्यावर मात करून निवडणूक कशी जिंकायची, याची 'निन्जा टेक्निक' सांगणारे एक बाबा सोशल मीडियावर समोर आले आहेत. भरत पवार असं या 'बाबा'चं नाव आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमधील माहितीनुसार, "भक्तांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा गुणधर्म"* असे स्वत:चे कौतुक करत आहेत. ते स्वत:ला महाकालीचे भक्त असल्याचेही दर्शवतात.
निवडणूक जिंकण्याची 'निन्जा टेक्निक' काय आहे?
भरत पवार नावाच्या या बाबाने जाहीरपणे हा अंधश्रद्धा पसरवणारा उपाय सांगितला आहे. निवडणुकीमध्ये तुम्हाला विजयी व्हायचे असेल आणि तुमच्यावर कुणी काळी जादू केली असल्याचा संशय असेल, तरीही तुम्ही एक उपाय करुन यश मिळवू शकता, असा दावा बाबा करत आहेत.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
यासाठी तुम्हाला तुमचा एक फोटो, चार लिंबू आणि तुम्ही वापरलेले कपडे घ्यावे लागतील. हे सर्व साहित्य तुमच्या अंगावरून सात वेळा उतरवून शनिवारीरात्री 12 वाजता मेलेल्या व्यक्तीच्या मैतात नेऊन टाकावे. बाबाने दावा केला आहे की, हे केल्याने 'दोषातून मुक्तता' होईल आणि 'यश नक्की मिळेल.
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे. असे असतानाही बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धेकडे वळवणारे व्हिडीओ मेसेज शेअर करत आहेत. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत असे सल्ले देणे हा गंभीर प्रकार आहे.