सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे चित्रविचित्र व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधी नवरामुलगा मायकल जॅक्सनप्रमाणे नाचतो तर कधी नवरीमुलगी सर्वकाही विसरुन लग्नसोहळ्यात ट्रेंडिग किंवा एखाद्या गाजलेल्या गाण्यावर ठेका धरते. या व्हायरल व्हिडीओमध्ये नव्या नवरीने सासरच्या मंडळींसमोर धमाका केल्याचे दिसतंय. ही नववधू सुरुवातीला थोडीशी लाजते, मग पदर बाजूला सारुन बिनधास्तपणे डान्स करते तेव्हा सर्वचजण तिच्याकडे आवासून पाहू लागतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नववधूचा डान्स करतानाचा व्हिडीओ
व्हिडीओ पाहून असे दिसतंय की घरातील महिलामंडळ नव्या सूनेचे स्वागत करण्यासाठी जमले आहेत. नवऱ्याची बहीण, काकी, मावशी सूनेला डान्स करण्यासाठी आग्रह करताना दिसत आहेत. पण जेव्हा थोड्या वेळाने सून अजिबात न घाबरता सर्वांसमोर बॉलिवूड स्टाइलमध्ये डान्स करू लागते, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. दागिन्यांनी सजलेल्या आणि वजनदार लेहंगा घातलेल्या या नवरीने लई भारी डान्स करुन सर्वांचे मन जिंकले. हरियाणवी गाण्यावर बायकोचा कमाल डान्स पाहून नवरा मुलगा देखील आश्चर्यचकित होतो. व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिलंय की, नवीन सून सर्वांना किती आवडलीय.
(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)
सोशल मीडियावर या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
(नक्की वाचा: मित्राचा डान्स पाहून नवरामुलगा स्वतःला रोखू शकला नाही, मग नवरीने एण्ट्री केल्यानंतर काय घडलं पाहा Viral Video)