देशभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक गुजरातमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पुलावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बाईकसोबत अडकला आहे. मात्र या संकटाच्या स्थितीतही ही व्यक्ती तंबाखू मळताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पुलावर अडकली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला उभे असलेले या व्यक्तीला पाहत आहेत. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी लोक काहीही करुन शकत नाहीत. मात्र पुराच्या पाण्यात अडकलेली ही व्यक्ती आरामात हात चोळताना दिसत आहे. ही व्यक्ती तंबाखू खात असावी असं दिसत आहे.
(नक्की वाचा- अमेरिकेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर 'टिकटॉक' अटॅक, शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण)
व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओ आतापर्यंत 1.3 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लाखो यूजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. पुरात अडकलेला बाईकस्वार वाचला की नाही? माहिती नाही. मात्र त्याची मृत्यू समोर दिसत असतानाही तंबाखू खाण्याच्या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
(नक्की वाचा - कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग)
बाईकस्वाराच्या या कृतीबद्दल अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अनेक युजर्सनी व्हायरल व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवली. भीतीपोटी त्याने तंबाखू खाण्यास सुरुवात केली असावी असं एकाने म्हटलं. तर मृत्यूलाही न घाबरता तंबाखू खाताना पाहून अनेक यूजर्सनी त्याच्या धाडसाला सलाम केला आहे. मात्र तो नक्की तंबाखू खात होता की नाही, स्पष्ट झालेले नाही. मात्र व्हिडीओमध्ये दिसतंय त्यावरुन नेटिझन्सनी तसा अंदाज बांधला आहे.