Viral Video: शेकडो वर्षांपासून वैज्ञानिकांना माहिती होते की झाडे पानांवर असलेल्या अतिशय सूक्ष्म छिद्रांच्या माध्यमातून श्वास घेतात. या छिद्रांना स्टोमाटा (Stomata) म्हणतात. हे स्टोमाटा कार्बन डायऑक्साइड (CO₂) वायू आत घेतात आणि ऑक्सिजन तसेच पाण्याची वाफ बाहेरील बाजूस सोडतात. पण ही प्रक्रिया आतापर्यंत केवळ सिद्धांतापुरती मर्यादित होती. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथील शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली आणि रेकॉर्डही केलीय.
Stomata In Sight म्हणजे काय? (What is Stomata In Sight Device)
या विशेष उपकरणाचे नाव Stomata In Sight आहे. यात हाय-रेझोल्यूशन मायक्रोस्कोप, गॅस एक्सचेंज सिस्टम आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअर एकत्रित जोडण्यात येते. पानाचा अतिशय छोटा भाग हाताच्या तळव्याएवढ्या चेंबरमध्ये ठेवला जातो; जेथे प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि CO₂ पूर्णपणे नियंत्रित केले जातात. याच ठिकाणी स्टोमाटाचे उघडणे-बंद होणे कॅमेऱ्यात कैद होते, हे दृश्य पाहिल्यानंतर जणू झाड स्वतःच आपल्या श्वासांची गोष्ट सांगताना दिसतंय.
प्रकाश, अंधार आणि पाण्याचा परिणाम (How Light and Water Affect Stomata)
संशोधक अँड्र्यू लीकी यांनी सांगितलं की, स्टोमाटा प्रकाशात उघडतात आणि अंधारात बंद होतात. याचे कारण म्हणजे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया (फोटोसिंथेसिस) होऊ शकेल आणि पाण्याचा अपव्यय कमी होईल. पण जेव्हा उष्णता जास्त असते किंवा पाण्याची कमतरता असते तेव्हा झाडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्टोमाटा बंद करू लागतात.
(नक्की वाचा: Viral Video: या काकांची 2 लग्न चर्चेत, पहिल्या लग्नाच्या वेळेस दुसरी पत्नी केवळ 7-8 महिन्यांची होती, सोशल मीडियावर धुमाकूळ)
शेतीसाठी हा शोध महत्त्वाचा का आहे? (Why This Discovery Matters for Agriculture)
शेती क्षेत्रासाठी हा शोध मोठा बदल घडवून आणू शकतो. पाण्याची कमतरता ही आज शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. स्टोमाटाचा अभ्यास करून वैज्ञानिक अशी बियाणे विकसित करू शकतात जी कमी पाण्यातही चांगले उत्पादन देतील. वाढत्या तापमान आणि दुष्काळाच्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकते.
(नक्की वाचा: Viral Video: जगातील सर्वात महागड्या हॉटेलची लई भारी झलक, एका रात्रीचे भाडे 22 लाख रूपये, आतून कसं दिसतं हॉटेल?)
या तंत्रज्ञानाला पेटंट मिळालंय, लवकरच ते शास्त्रज्ञांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. Plant Physiology या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या माहितीमुळे झाडांद्वारे घेतला जाणारा गुप्त श्वास आता रहस्य राहिलेले नाही.