World Most Expensive Hotel: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. व्हिडीओद्वारे एका युजरने जगातील सर्वात महागड्या हॉटेलची झलक दाखवलीय, आश्चर्यकारक बाब म्हणजे येथील प्रत्येक गोष्ट सोन्याची आहे आणि एका रात्रीचे भाडे ऐकूनही लोक थक्क झाले आहेत.
हॉटेल बाहेरूनच दिसतो शाही थाट
व्हिडीओमध्ये सर्वप्रथम हॉटेल बाहेरील दृश्य दाखवले जातंय, जेथे एकापेक्षा एक महागड्या कार उभ्या आहेत. हॉटेल बाहेरील वातावरण पाहूनच हे स्पष्ट होते की ही जागा सामान्य जगातील श्रीमंतांसाठीच बनवलीय. आत प्रवेश करताच पाहुण्यांना एक महागडे सॅनिटायझर दिले जाते, जे या हॉटेलच्या भव्यतेची झलक दर्शवते.
प्रत्येक वस्तू सोन्याची!
हॉटेलचे दरवाजे उघडताच समोर महाराजांच्या राजवाड्यासारख्या भव्य पायऱ्या दिसतात. व्हिडीओमध्ये दाखवलंय की, येथे इमर्जन्सी एक्झिटपासून ते चहाच्या भांड्यापर्यंत सर्व काही सोन्याच्या धातूपासून बनवलंय. डायनिंग एरियामधील थ्री-डी डायनिंग टेबल, सोन्याचा टीव्ही, चमचे आणि अन्य सजावटीच्या वस्तूंमुळे हॉटेल एखाद्या राजवाड्यासारखे दिसतंय.
पाहा Video:
बाथरूमपासून सोफ्यापर्यंत सर्वकाही खास
हॉटेलचे बाथरूमही तितकेच आलिशान आहे. इथले शॉवर, जेट स्प्रे आणि नळ देखील सोन्याचे आहेत. इतकेच नव्हे तर हॉटेलमधील सोफा बिबट्याच्या कातडीपासून बनवण्यात आल्याचे सांगितलं जातंय, ज्यामुळे हे हॉटेल चर्चेत आहे. इथली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट ऐश्वर्याच्या उच्च पातळीचे दर्शन घडवते.
(नक्की वाचा: Viral News: गाणं वाजू दया! 800 रुपयांचं लॉलीपॉप कि म्युझिक प्लेअर? खाताच कानामध्ये वाजू लागतंय गाणं)
एका रात्रीचे 22 लाख रुपये, कॉफीची किंमत 10 हजार रुपयेव्हिडीओमधील माहितीनुसार, या हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे सुमारे 22 लाख रुपये आहे. तर इथे मिळणाऱ्या एका कॉफीची किंमत तब्बल 10 हजार रुपये असल्याचे सांगितले जातंय. या हॉटेलमध्ये फक्त जगातील सर्वात मोठे अब्जाधीश आणि कोट्यधीशच मुक्काम करतात. सामान्य लोकांसाठी ही जागा फक्त पाहण्यापुरतीच आहे, असे म्हटले जातंय.
(नक्की वाचा: Viral Video: Blinkitहून रात्री उशीरा महिलेनं असं काही ऑर्डर केले, Delivery Boyला आला संशय, मग जे घडलं ते...)
व्हिडीओ झालाय सुपर व्हायरलया भव्य हॉटेलचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @sarthaksachdevva या युजरने शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 19 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर 1 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोक हॉटेलची भव्यता पाहून थक्क झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये याला "सोन्याचा महाल" असे म्हणत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

