
Weight Loss Challenge in Company : लठ्ठपणा किंवा स्थुलता हा विषय जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. लठ्ठपण्याची समस्या आता कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत पोहोचली आहे. चीनमधील प्रसिद्ध टेक कंपनीने Insta360 (Arashi Vision Inc) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी स्कीम सुरू केली आहे. त्याचं नाव आहे मिलियन युआन वेट लॉस चॅलेंज. या उपक्रमाअंतर्गत जे कर्मचारी वजन कमी करतील त्यांना मोठी रक्कम बोनसच्या स्वरुपात मिळेल. यासाठी कंपनीने तब्बल एक मिलियन युआनचा (साधारण १.२४ कोटी) बोनस पूल तयार केला आहे.
अर्धा किलो वजन कमी करा आणि कमवा ५०० युआन
या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना नोंदणी करावी लागेल. यानंतर प्रत्येक अर्धा किलो वजन कमी झाल्यावर ५०० युआन (साधारण ६,२००० रुपये) चं बक्षीस दिलं जातं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एक किलो वजन कमी केलं तर त्याला एक हजार युआन (१२,४०० रुपये मिळतात.)
वजन वाढलं तर दंड भरावा लागेल..
कंपनीने या योजनेत एक रंजक अटकही घातली आहे. एक एखाद्या कर्मचाऱ्याचं वजन पुन्हा वाढलं तर त्याला ८०० युआन (साधारण ९,९०००) प्रति अर्धा किलोवर दंड भरावा लागेल. वजन कमी करण्यासाठी जितका बोनस मिळेल, तितकेच पैसे वजन वाढल्यामुळे आकारले जातील.
९० दिवसात २० किलो वजन कमी केल अन् जिंकली २.४८ लाख
या वर्षातील सर्वात मोठी रक्कम जिंकलेली विजेती जी याकी यांनी ९० दिवसात २० किलो वजन कमी केलं आणि २० हजार युआन (साधारण २.४८ लाख) पैसे जिंकले. जी ने सांगितलं, है सौंदर्यासाठी नाही तर आरोग्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होतं.
कर्मचाऱ्यांचं आरोग्य राखणं हा कंपनीचा हेतू
कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या उपक्रमाचा हेतू कर्मचाऱ्यांनी स्वस्थ जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणं आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार झालं आहे.
सोशल मीडियावर मिश्रित प्रतिक्रिया..
सोशल मीडियावर लोक या उपक्रमाचं कौतुक करीत आहेत. काहींनी याला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी रचनात्मक पाऊल असल्याचं सांगितलं. तर काहींनी वजन वाढण्यावर लावलेला दंडावर रोष व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world