जाहिरात

Weird Frog : जगातील सर्वात विचित्र बेडूक, तोंडात लपवून ठेवलेत डोळे; स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

कधी कधी निसर्ग अशा काही गोष्टी घडवतो ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटतं. असाच एक प्रकार समोर आला आहे.

Weird Frog : जगातील सर्वात विचित्र बेडूक, तोंडात लपवून ठेवलेत डोळे; स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

Weird Frog : जगातील सर्वात विचित्र बेडूक, तोंडात लपवून ठेवलेत डोळे; स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!कधी कधी निसर्ग अशा काही गोष्टी घडवतो ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटतं. असंच काहीस कॅनडामध्ये घडलं आगे. येथे एका मुलीला असा बेडूक दिसला ज्याचे डोळे बाह्यबाजूला डोक्यावर नाही तर त्याच्या तोंडात होते. पहिल्यांचा हा प्रकार विचित्र वाटेल, मात्र ही अफवाह नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या सत्य आहेत. 

जगासाठीही हैराण करणारं प्रकरण (frog eyes inside mouth)

कॅनडाच्या ओंटारिया भागात बर्लिंगटनमध्ये राहणारी एका शालेय विद्यार्थिनी डिड्रे आपल्या अंगणात खेळत होती. तेव्हा एक विचित्र बेडूक दिसला. तो डोळे बंद करून बसलेला होता. त्याने तोंड उघडताच डिड्रे जोरात ओरडली. त्याच्या तोंडात दोन चमकणारे डोळे दिसत होते. डिड्रेला वाटतं त्याने दुसरा एखादा जीव गिळला असेल. मात्र लक्ष देऊन पाहिलं तर ते डोळे बेडकाचे स्वत:चेच होते. 

नक्की वाचा - Common Password: 50,000 खासगी व्हिडिओ लीक... तुम्हीही असाच पासवर्ड ठेवलाय? 100 टक्के फोन हॅक होणार

बेडकाचं केलं नामकरण...(weird frog mutation)

डिड्रेने या बेडकाचं नाव लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या पात्रावरुन गोलमचं नाव दिलं. गोलम अंधारात राहत होता. तिने या बेडकाचे फोटो काढले आणि स्थानिक वृत्तपत्र Hamilton Spectator ला पाठवले. वृत्तपत्राचा फोटोग्राफर स्कॉर्ट गार्डनरला आधी ही मस्करी वाटली. मात्र त्याने नीट पाहिलं तेव्हा तोही हैराण झाला.  यानंतर हा बेडून देशभरात प्रसिद्ध झाला. 

हे विचित्र म्युटेशन कसं घडलं? (rare animals facts)

शास्त्रज्ञांच्या मते, हे एक अनुवांशिक म्युटेशन आहे. म्हणजेच गर्भाच्या विकासादरम्यान होणारा अडथळा.
सामान्यतः बेडकाचे डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला विकसित होतात. परंतु या प्रकरणात जनुकाची दिशा उलट झाली. टोरंटो विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स बोगर्ट यांच्या मते, 'गोलम'चे डोळे मागे सरकले आणि तोंडाच्या आत विकसित झाले. हे मॅक्रोम्युटेशनचे प्रकरण आहे, जे खूप दुर्मीळ आहे. रासायनिक प्रदूषण किंवा पर्यावरणीय परिणामांची भूमिका यात महत्त्वाची असण्याची  शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com