Viral News : भाडे 25000 रुपये, बंगळुरुतील घर सोशल मीडियावर का होतंय व्हायरल; पाहा Video

Viral Video : तरुण घराच्या मध्यभागी उभा राहुन दोन्ही पसरून घराच्या आकाराचा लोकांना अंदाज देत आहे.  या रुमला 1 बीआर म्हणजे वन बाल्कनी रुम म्हटलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईत घरांच्या किंमती आणि घरांचा आकार यात खूप तफावत आहे. हीच परिस्थिती हळूहळू बंगळुरूमध्ये होताना दिसत आहे. बंगळुरूमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान फ्लॅट दाखवण्यात आला आहे, ज्याचं महिन्याचं भाडं 25 हजार रुपये आहे. तरुणाने मजेशीर पद्धतीने ही बाब मांडली आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर यावरून चर्चा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्हिडीओ शूट करणारा तरुण घराची खासियत मिश्कीलपणे सांगताना दिसत आहे. तरुण घराच्या मध्यभागी उभा राहुन दोन्ही हात पसरून घराच्या आकाराचा लोकांना अंदाज देत आहे.  या रुमला 1 बीआर म्हणजे वन बाल्कनी रुम म्हटलं आहे. 

(नक्की वाचा-  Saif Ali khan : जलद रिकव्हरी, रिक्षाने प्रवास, हल्ल्याबाबत संशय; सैफ अली खानने लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं दिलं उत्तर)

या घराचं वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ एकच व्यक्ती नीट राहू शकतो. एवढ्या लहान खोलीचा फायदा असा आहे की तुम्ही वस्तू खरेदी करू शकत नाही. खरेदी केली तर ठेवणार कुठे? तुम्ही गर्लफ्रेंड बनवू शकत नाही. कारण ती घरी आली तरी राहणार कुठे? घर बघूनच ती ब्रेकअप करेल. त्यामुळे पैशांची बचत नक्की होईल, असं हा तरुण मिश्किलपणे सांगताना दिसत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Rahul Solapurkar : जॅगोदादा ते टकलू हैवान, ऐतिहासिक वादात अडकणारे राहुल सोलापूरकर कोण आहेत? )

या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, "यापेक्षा मोठं तर माझं टॉयलेट आहे." आणखी एकाने लिहिलं की, " हे तर सुरु होण्याआधीच संपलं." आणखी एकाने लिहिलं की, “मुंबईतही हेच आहे. काही दिवसांनी पुण्यातही असंच होणार आहे. लोकसंख्या अशी वाढत राहिली तर सगळी शहरं अशीच होतील.”

Topics mentioned in this article