सोशल मीडियावर सध्या एका वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाढदिवसाच्या पार्टीमुळे व्हायरल झालेला नाही. तर, एका महिलेच्या नागिण डान्समुळे (Nagin Dance) तो व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये एका डिजेवर नागिनमधील गाणं वाजत होतं. त्यावर ही महिला डान्स करत होती. ते पाहताच दोन जण जमिनीवर पडले आणि महिलेसोबत जोरदार डान्स करु लागतात. कधी ते हाताला सापाच्या फण्यामध्ये रुपांतर करुन जमीनीवर पडत होते तर कधी गारुडी बनल्याचा अभिनय करत होते. या दोघांनी केलेली धमाल सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एक महिला 'मै नागिन तू सपेरा...' या गाण्यावर नाच करत आहे. ते पाहातच एक मध्यमवयीन वयाची व्यक्ती उत्साहात येऊन महिलेच्या समोर येऊन नाच करु लागतात. या दोघांचा नाच पाहाताच आणखी एका मध्यमवयीन व्यक्तींनाही डान्स करण्याचं स्फुरण मिळतं आणि ते देखील नाचू लागतात. पार्टीमधील सर्व व्यक्ती या तिघांच्या डान्सचा आनंद घेत आहेत.
पाहा Video:
हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचं नाव ट्विटर) @Hi_Itsok या नावाच्या युझरनं शेअर केलाय. 'एक हसीना दो दीवाने, बहुत प्यारे और मस्ताने, देखिए और आनंद लीजिए पसंद आए शेयर कीजिए,' असं त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो शेअर होतोय. 'अंकलजी नागमणी घेऊनच थांबतील,' 'लूप्त होत असलेल्या कलेमध्ये या तिघांनी जीव ओतलाय,' या सारख्या निरनिराळ्या प्रतिक्रियांचा त्यावर पाऊस पडला आहे.
हे देखील वाचा : 3 लेकरांची आई, विजेच्या खांबावर चढली, भलतीच मागणी, पुढे काय झालं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world