जाहिरात
Story ProgressBack

3 लेकरांची आई, विजेच्या खांबावर चढली, भलतीच मागणी, पुढे काय झालं?

Read Time: 2 min
3 लेकरांची आई, विजेच्या खांबावर चढली, भलतीच मागणी, पुढे काय झालं?
गोरखपूर:

एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वच जण चक्रावून जाल. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये. एक महिला गावातल्या विजेच्या पोलवर चढून बसली होती. त्यानंतर संपुर्ण गाव तिथं जमा झालं. पण खरी गम्मत पुढे आहे. ही महिला कोणत्या आंदोलनासाठी हे करत नव्हती तर तिच्या एका भलत्याच मागणीसाठी ती असं करत होती. जेव्हा तिची मागणी काय आहे हे गावकऱ्यांना समजलं तेव्हा तर त्यांनी आपल्या कपाळालाच हात लावल. 

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये. इथं राहणारी एक महिला आहे. तिला तीन मुलंही आहेत. गेल्या सात वर्षापासून तिचे विवाहवाह्य प्रेम संबध होते. ही बाब तिच्या पतीला समजली. त्यानं तिला या गोष्टीसाठी विरोध दर्शवला. ती वारंवार पतीला आत्महत्या करण्याची धमकी देवू लागली. मात्र एक दिवस ती थेट गावातल्या विजेच्या पोलवर चढली. गाव जमा झाला. त्यांच्या समोरचं तिनं आपल्याला पतीसह बॉयफ्रेंड बरोबरही राहायचं आहे अशी मागणी केली. जोपर्यंत पती हे मान्य करणार नाही तो पर्यंत विजेच्या खांबावरून खाली येणार नाही असं तिनं सांगितलं. पतीनं त्याच्याच घरात प्रियकरालाही बरोबर राहू द्यावं अशी तिची मागणी होती.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य - सोशल मीडिया

गावातल्या लोकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती कोणाचं ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आता काय करायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला. त्यांनी ही बाब तातडीनं पोलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बोलावून घेतलं. पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढली. तिचा राग शांत केला. चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. त्यानंतर ती महिला विद्युत खांबावरून खाली उतरली. ती महिला सध्या सुखरूप आहे. 

शेजारच्या गावातील एका तरुणासोबत या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पतीने तिला नाकारलं होतं. त्यानंतर महिलेने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. महिनाभरापूर्वी तर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न तिने केला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination