Trending Video: 'ती' वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच गेली अन् व्हिडीओ बनवायची वेळ आली, सर्वच झाले थक्क

तरुणीनं वंदे भारतच्या स्लिपर ट्रेनमध्ये केलेल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.जवळपास चार महिन्यांआधी सुरु झालेल्या या नव्या ट्रेनबाबत ट्रॅव्हल कन्टेंट क्रिएटर रूची त्रिवेदीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vande Bharat Train Video Viral

Vande Bharat Travel Experience: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून नवनवीन भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओंच्या माध्यमातून काही लोक टॅलेंट दाखवतात. तर काही त्यांचा अनुभव शेअर करत असतात. नुकतच एका महिला ट्रॅव्हलरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.यामध्ये तरुणीनं वंदे भारतच्या स्लिपर ट्रेनमध्ये केलेल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.जवळपास चार महिन्यांआधी सुरु झालेल्या या नव्या ट्रेनबाबत ट्रॅव्हल कन्टेंट क्रिएटर रूची त्रिवेदीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पडदे आणि लाईट्सचं शानदार डिझाईन

व्हायरल व्हिडीओत महिला कोचमध्ये लावलेले पडदे,लाईट्स,बेड आणि पूर्ण डिझाइनचं या तरुणीने खूप कौतुक केलं आहे.तिने म्हटलं की, ती यावेळी वंदे भारतच्या स्लिपर कोचमध्ये सेकंड एसीत बसलेली आहे.येथील सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केल्या आहेत.विशेषत:पडदे आणि लाईट्सचा स्टँडर्ड पाहून तिने याला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला.याचसोबत तिने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चादरीही दाखवल्या आणि या सुविधांबद्दल चांगला रिव्ह्यू दिला. 

Advertisement

नक्की वाचा >>Pune News: पुण्यात शेतकरी महिलांसमोर भयनाक प्रकार, JCB ने उखडली उसाची शेती, आंबा-सिताफळाची बाग, काय घडलंय?

सुंदर आणि आकर्षक चादरी

महिला चादर दाखवून म्हणते,ट्रेनमध्ये तिला ब्रँड न्यू चादर दिल्या आहेत.ज्याचे प्रिंट खूप सुंदर आणि आकर्षक आहेत. तसच चादरीचा रंगही खूप चांगला आहे.त्यानंतर रुचीने ट्रेनच्या साफ-सफाईबाबत म्हटलं, ही ट्रे्न खूप चमकत आहे. लोकांना आवाहन केलं की,सर्व प्रवाशांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि अशाच प्रकारे साफ-सफाई करत राहा. 

नक्की वाचा >> Snake Village Of India: महाराष्ट्रात आहे सापांचं गाव, नागही आरामात फिरतात, 'त्या' ठिकाणाची आहे मोठी खासीयत

माईंड ब्लॉईंग अनुभव 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @radioactiveruchi नावाच्या हँडलवर शेअर केला आहे.या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"भारताच्या या नव्या जनरेशनच्या स्लीपर ट्रेनमध्ये माझा पहिला प्रवास होता. हा खूप अप्रतिम अनुभव होता. या व्हिडीओला यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.एका यूजरने लिहिलं की,'भारतीय रेल्वेत एक सर्वात चांगला अनुभव'.दुसऱ्या यूजरने लिहिलं,'आता आंतरराष्ट्रीय लेव्हलपर्यंत मेन्टेन ठेवणं आपली जबाबदारी आहे भाई लोक.'दुसऱ्या एकाने म्हटलंय की,'बदलतं भारत'