जाहिरात

Viral Video: विमानात कबुतर उडवतात का? मराठी महिलेचा तुफान राडा; बिचाऱ्याला बेदम मारलं

Marathi Women Fighting In Plane: विमानांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्यांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधले आहे. 

Viral Video: विमानात कबुतर उडवतात का? मराठी महिलेचा तुफान राडा; बिचाऱ्याला बेदम मारलं

Fighting In Plane Viral Video: एसटी प्रवासात, रेल्वे प्रवासावेळी प्रवाशांमध्ये होणारी वादावादी अन् राडे अनेकदा पाहिले असतील. मात्र अलिकडच्या काळात विमानातही प्रवाशांमध्ये  घमासान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विमानांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्यांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधले आहे. 

BJP MLA Wife : भाजपा आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार 2025' वाचा ऐश्वर्या राजनं कसा जिंकला मुकुट

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर भांडणाचे, भयंकर अपघाताचे, लग्नातील डान्सचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या एका विमान प्रवासातील एका व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मराठी महिलेने सहप्रवाशांसोबत जोरदार हुज्जत घातल्याचे दिसत आहे.

विमान काही चिमण्या, कबुतर उडवायची जागा आहे का? असं म्हणत या महिलेने सोबत प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींची चांगलीच खरडपट्टी केली. हा वाद नेमका कशावरुन सुरु झाला? हे समोर आलं नाही मात्र काही प्रवाशांनी विमानात कबुतर उडवल्याने हा राडा झाल्याचं दिसत आहे. फ्लाईटमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांकडे कबुतरे आढळली, ती इकडे तिकडे उडाली, त्यावरुनच या महिलेने संताप व्यक्त केला.

विमानात कबुतरे, चिमण्या उडवतात का? तुम्ही जादूटोणा करता का? असं त्या महिलेने विचारले. यावर आम्ही काय चोऱ्यामाऱ्या केल्या का? कबुतर काय तुमच्या डोक्यावर बसले का? असा सवाल त्या प्रवाशांनी केला. यावरुनच या प्रवाशांमध्ये जोरदार जुंपली. आवाज मलाही वाढवता येतो.. असं म्हणत मराठी महिलेने दोन्ही  प्रवाशांना जाब विचारला. यावेळी शेजारी बसलेल्या मुलाला तिने चांगले झोडपूनही काढले. 

दरम्यान, हा सगळा प्रकार पाहून विमानातील एयर होस्टेसचीही चांगलीच तारांबळ उडाली. त्या मुली या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र महिला काही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानेच हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

Rapido controversy : रॅपिडो वादात नवा ट्विस्ट, आणखी एक CCTV व्हायरल; तरुणीचं वेगळचं रूप आलं समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com