जाहिरात

फक्त 'या' एका झाडाने संपूर्ण शहरच झाकलंय! 20 एकर जमिनीवर पसरलंय, कुठे आहे जगातील सर्वात मोठं झाडं?

जर कोणी म्हटलं की 'फक्त एका झाडामुळे संपूर्ण जंगलच बनतं, तर अनेकांना विश्वासच बसणार नाही. पण हे शंभर टक्के खरं आहे. झाडाचा व्हिडीओ बघून चक्रावून जाल.

फक्त 'या' एका झाडाने संपूर्ण शहरच झाकलंय! 20 एकर जमिनीवर पसरलंय, कुठे आहे जगातील सर्वात मोठं झाडं?
One Tree Forest
मुंबई:

Worlds Largest Cashew Tree : जर कोणी म्हटलं की 'फक्त एका झाडामुळे संपूर्ण जंगलच बनतं, तर अनेकांना विश्वासच बसणार नाही.पण ब्राझीलमध्ये हे खरंच घडलं आहे. एक असं झाड जे इतकं पसरलं की त्याने २० एकर जमीन आपल्या सावलीत झाकली.इतकं की पूर्ण फुटबॉल स्टेडियमसुद्धा त्याच्या खाली हरवून जाईल.ही कथा निसर्गाच्या त्या जादुई शक्तीची आहे,जी कधी कधी मानवी समजुतीच्या पलीकडे ‘चमत्कार'घडवते. 

ब्राझीलमधील रियो ग्रांडे दो नॉर्टे राज्यात असलेले ‘Cajueiro da Praia'ज्याला लोक प्रेमाने ‘काजूचे विशाल झाड'म्हणतात.आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.सन 1888 मध्ये एका मच्छीमाराने दोन काजूची रोपे लावली होती.त्यापैकी एक रोप वाढत वाढत इतके पसरले की संपूर्ण जंगल तयार झाले.आज हे झाड तब्बल 8.5 हेक्टर (85,000 चौ. मीटर) क्षेत्रात पसरले आहे. म्हणजेच एक झाड = 20 एकर हिरवळ.

या झाडाच्या सावलीत बसतात 70000 लोक

साधारण झाडांच्या फांद्या जमिनीला लागल्या की तुटतात.पण या झाडात एक दुर्मिळ जनुकीय बदल (जेनेटिक म्युटेशन)आहे. याच्या फांद्या जमिनीला स्पर्श करताच तिथून नवीन मुळे फुटतात आणि तो भाग नवीन खोड बनतो.म्हणजे हे झाड हळूहळू पसरते आणि दरवर्षी ६–८ मीटरने वाढत जाते.आज या झाडाला 5000+ खोडे, 80 लाख पाने आहेत आणि दरवर्षी 80000 काजू (सुमारे 2.5 टन) उत्पादन होते.

नक्की वाचा >> ऐश्वर्या रायच्या 'या' सिनेमामुळे सलमान खानची सटकली होती! म्हणाला होता, "एक कुत्राही गेला नाही.."

इथे पाहा या महाकाय झाडाचा व्हिडीओ

स्थानिक लोक याला ‘Tree of Laziness' म्हणतात.कारण याची सावली इतकी थंड आणि गडद आहे की एकदा आडवे झालात की उठावंसं वाटत नाही. इथे रेस्टॉरंट, वॉकवे, गिफ्ट शॉप आणि व्ह्यूइंग डेक तयार केले आहेत. दरवर्षी 10 लाखांहून अधिक पर्यटक इथे येतात. वरून पाहिल्यावर संपूर्ण परिसर हिरव्या समुद्रासारखा दिसतो.श्वास रोखून धरणारा नजारा.इतक्या वेगाने पसरत असल्यामुळे याच्या मुळांनी आता रस्ते आणि इमारतींना नुकसान पोहोचवायला सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञ इशारा देत आहेत की जर याची वाढ थांबवली नाही.तर पुढील ५० वर्षांत हे संपूर्ण नाताल शहर झाकून टाकेल.तरीही लोक याला निसर्गाचे आठवे आश्चर्य म्हणतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com