Fabergé Egg Sold for More Than $30 Million: एका अंड्याची किंमत साधारण किती असू शकते? ७ रुपये, १० रुपये किंवा जास्तीत जास्त २५ रुपये. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडे अंडे तब्बल ३०.२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 273 कोटी रुपये आहे. या एका अंड्याच्या किंमतीत 100 हून अधिक हेलिकॉप्टर सहज खरेदी करु शकता. काय आहे या अंड्याची खासियत? जाणून घ्या..
जगातील महागडे अंडे.
जगातील या महागड्या अंड्याला हिवाळी अंडे असं नाव देण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी या अंड्याचा लिलाव करण्यात आला, ज्याला मिळालेल्या किंमतीने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे अंडे प्रसिद्ध रशियन ज्वेलरी फॅबर्गे यांनी तयार केले होते जे त्यांच्या कलात्मकतेचे एक अद्वितीय उदाहरण आहे. बर्फाच्या वितळणाऱ्या तुकड्यासारखे दिसणारे हे अंडे क्रिस्टलपासून बनलेले आहे. त्याला अंदाजे ४,५०० लहान हिरे जडवलेले आहेत. अंड्याच्या आत फुलांनी भरलेली टोपली देखील ठेवली आहे.
Husband on Rent: 'या' देशात महिलांवर नवरा भाड्यानं घेण्याची वेळ, अगदी एक तासासाठीही मिळतो पुरुष!
या अंड्याचा इतिहास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. वृत्तानुसार, हे अंडे रशियाचे झार निकोलस द्वितीय यांनी त्यांची आई, महाराणी मारिया फेडोरोव्हना यांना १९१३ मध्ये ईस्टरला भेट म्हणून दिले होते. हे केवळ कलाकृती नव्हती, तर राजघराण्याच्या वैभवाचे सर्वात मोठे प्रतीक होते, जे रशियन क्रांतीमध्ये संपले.
🚨 JUST IN
— Mambo Italiano (@mamboitaliano__) November 4, 2025
One of the rarest moments in history
A Fabergé Egg will be put up for sale at auction
On December 2nd at Christie's
A breathtaking 1913 masterpiece valued at around $27 million
A storm of diamonds, platinum, rock crystal, quartz, nephrite, and gold
Breathtaking! https://t.co/0oSc1r6I40 pic.twitter.com/hIpnJgoPif
विंटर एगचा इतिहास!
असे म्हटले जाते की झारच्या राजवटीच्या समाप्तीनंतर हे अंडे हरवले होते, परंतु १९९० च्या दशकात ते पुन्हा समोर आले. तेव्हापासून, हे अंडे प्रत्येक वेळी विकले गेले आहे आणि प्रत्येक लिलावात त्याला मोठी किंमतही मिळते. आता, ₹२७३ कोटींना विकून, या अंड्या,ने सिद्ध केले आहे की कला आणि इतिहास संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहेत.
Viral Video: भाजप आमदाराच्या मुलानं खरेदी केली 1111111 रुपयांची घोडी, खासीयतही भन्नाट, युद्धकाळात...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world