Young Man barks & Behaves like a Dog: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कच्छवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीपुरवा गावात राहणारा एक मुलगा अचानक कुत्र्यासारखा भुंकू लागल्या ज्यामुळे कुटुंबीय भयभीत झाले आहे. या विचित्र स्थितीमुळे कुटुंब आणि शेजारी चिंतेत असून त्याच्यावर उपचारासाठी कुटुंबियांची धावपळ सुरु आहे. या तरुणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुत्र्यासारखा भुंकू लागला तरुण
समोर आलेल्या माहितीनुसार, जोगीपुरवा गावातील रहिवासी भाईलाल सुमारे चार महिन्यांपूर्वी त्याच्या आजी-आजोबांना भेटायला गेला होता तेव्हा त्याला कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर, त्याला त्याच्या आजी-आजोबांच्या घरी पहिले अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर कच्छवा सामुदायिक आरोग्य केंद्रात दुसरे इंजेक्शन देण्यात आले,रेबीज रोखण्यासाठी पाच इंजेक्शनचा पूर्ण डोस आवश्यक असल्याचे वृत्त आहे, परंतु किशोराला फक्त दोनच इंजेक्शन देण्यात आले. या निष्काळजीपणाचे परिणाम आता गंभीर आहेत.
Beed News : बीडमधील संतापजनक प्रकार; राहत्या घरातून विवाहित महिलेला उचललं अन् केलं घृणास्पद कृत्य
वर्तणुकीत बदल
गेल्या काही दिवसांपासून आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल होत आहेत. तो कुत्र्यांसारखे आवाज काढू लागला आहे आणि त्याचे चालणे आणि बसणेही असामान्य झाले आहे. यामुळे कुटुंब आणि ग्रामस्थांना धक्का बसला आहे. या मुलाचे वडील अपंग असून ते आपल्या मुलाला बरे करण्यासाठी मदत मागत आहेत. त्याची प्रकृती पाहून काही लोकांनी कुटुंबाला त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला कच्छवा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पांडे यांच्या मते, किशोरवयीन मुलाला जाणवणारी लक्षणे रेबीजशी संबंधित गंभीर स्थिती असू शकतात. त्यांनी स्पष्ट केले की जेव्हा रुग्णाला रेबीजचे पूर्णपणे लसीकरण केले जात नाही तेव्हा हायड्रोफोबियासारखी लक्षणे विकसित होऊ शकतात. या स्थितीत, व्यक्तीला पाण्याची भीती वाटते आणि श्वसनमार्गावर परिणाम झाल्यामुळे आवाज बदलू शकतो.