आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे समोर आले. दरम्यान बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. बीडमधून राहत्या घरातून एका विवाहित महिलेला उचलून गावाबाहेर आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. राहत्या घरातही महिला सुरक्षित नसेल तर सार्वजनिकपणे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
राहत्या घरात झोपलेल्या महिलेल उचललं...
बीड तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला गावामध्ये आणून गावाच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वैभव पटेकर याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world