Young Couple Romance On Bus Stand Viral Video: 'प्यार किया तो डरना क्या' असं म्हणतात? प्रेमात पडलेल्या तरुण- तरुणीला जगाचे भान नसते. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये प्रेमीयुगुलांची सार्वजनिक ठिकाणीही रासलीला रंगलेली पाहायला मिळते. सध्या अशाच एका नव्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामधील तरुण - तरुणीचा प्रताप पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड बस स्टॉपवर उघडपणे रोमान्स करताना दिसत आहेत. ते एकमेकांना मिठी मारतात आणि चुंबन देखील घेतात. आजुबाजुला लोकांची वर्दळ असतानाही या कपलचा प्रताप पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. बस स्टॉपवर रोमान्स करतानाचा हा व्हिडिओ @divyakumaari या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आजकल लोग कितने पागल हो चुके है खुले आम बस स्टैंड पर ही... 🤦♀️🤦♀️
— दिव्या कुमारी (@divyakumaari) September 18, 2025
मोदी जी इन लोगों के लिए oyo सस्ता क्यों नहीं कर देते🤦♀️
pic.twitter.com/GuuURzA9lu
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पांढरी साडी नेसलेली एक मुलगी आणि निळा शर्ट घातलेला मुलगा उभा आहे. सुरुवातीला मुलगी मुलाच्या गालावर चापट मारते, त्यानंतर दोघे एकमेकांमध्ये हरवून जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टॉपवर बसची वाट पाहत असलेले इतर बरेच प्रवासी होते, परंतु हे तरुण- तरुणी तिथेच रोमान्स करायला लागतात.
१८ सप्टेंबर रोजी X वर अपलोड केलेला हा व्हिडिओ ४,६९,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या तरुण तरुणीला आवरण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी व्हिडिओ काढणेच चुकीचेआहे असे म्हणत कपलचे समर्थन केले आहे. एका युजरने लोक किती वेडी झाली आहेत? असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world