Nepal Bus Accident : नेपाळमध्ये बस नदीत कोसळून भीषण अपघात, 14 भारतीयांचा मृत्यू

Nepal Bus Accident : अपघातग्रस्त बस गोरखपूरची होती आणि पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहारा येथे महामार्गावरून हा अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 1 min

The bus was en route to Kathmandu from Pokhara.

New Delhi:

नेपाळमध्ये भीषण बस अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 29 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. भारतीय नंबर प्लेटची बस ममार्सयांगडी नदीत कोसळून हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस गोरखपूरची होती आणि पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहारा येथे महामार्गावरून हा अपघात झाला. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 45 सशस्त्र पोलिस दलाचे पथक अपघातस्थळी पोहोचले असून ते बचावकार्य करत आहेत. नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ लष्कराकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

उत्तर प्रदेश सरकारने देखील घटनेची दखल घेत उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना घटनास्थळी पाठवले आहे. उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'मीडिया रिपोर्ट्स आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 वाजता चालक आणि एका सहाय्यकासह महाराष्ट्रातील सुमारे 41 प्रवाशांना घेऊन जाणारी बस मार्सयांगडी नदीत कोसळली.

Advertisement
Topics mentioned in this article