जाहिरात

25 वर्षीय भारतीय वंशाच्या अमनने रचला इतिहास! एलन मस्कने खरेदी केलं स्टार्टअप, डीलची किंमत ऐकून हैराण व्हाल!

आता SpaceX द्वारा केलेल्या या मोठ्या अधिग्रहणानंतर अमन सांगरची संपत्ती अरब डॉलरमध्ये होण्याची आशा आहे.

25 वर्षीय भारतीय वंशाच्या अमनने रचला इतिहास! एलन मस्कने खरेदी केलं स्टार्टअप, डीलची किंमत ऐकून हैराण व्हाल!

अमेरिकेतील अंतराळ आणि तंत्रज्ञान विश्वातून एक मोठी बातमी आली आहे. AI आधारित कोडिंग स्टार्टअप Cursor च्या जगात सर्वात चर्चेत असलेली कंपनीपैकी एक SpaceX ने तब्बल ६० अरब डॉलरच्या किमतीत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या डीलनंतर कर्सरचा संस्थापक रात्रीतून अरबपतींच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे. या संस्थापकांमध्ये एक नाव असंही आहे ज्याचा भारतीय मूळांशी घट्ट नाते आहे. आपण अमन सांगरविषयी बोलत आहोत. त्याने वयाच्या २५ व्या वर्षी असं यश मिळवलं ज्याचं स्वप्न जगभरातील लाखो तरुण पाहतात. 

कमी काळात तंत्राज्ञान क्षेत्रात केलं मोठं नाव

अमन सांगर Cursor चा सह-संस्थापक आहे. ही कंपनी एआयच्या मदतीने सॉफ्टवेयर डेव्हलपर्ससाठी कोड लिहिणे आणि प्रोग्रॅमिंग सोप करण्याचं काम करते. हा स्टार्टअप २०२२ मध्ये सुरू झाला होता आणि अत्यंत कमी काळात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठं नाव केलं. 

अमन सांगरचे कुटुंबीय भारतीय वंशाचे आहेत. त्याचे वडील अरविंद सांगर भारतातील प्रतिष्ठित संस्था आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आयआयटीमधून इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. त्यांनी एक जागतिक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी नैसर्गिक संसाधनं आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करते. अमनची आई शिल्पा सांगर एक ऑर्थोडॉन्टिस्ट, उद्योगपती आणि गुंतवणूकदार आहे. तिचं बालपण मुंबईत गेलं. यानंतर ती अमेरिकेत गेली. येथे अरविंद सांगर यांच्याशी भेट झाली आणि दोघांनी लग्न केलं. त्यांच्या कुटुंबात अमनशिवाय त्याची एक बहीणही आहे. 

शिक्षण घेत असताना कंपनीची स्थापना...

अमनचं बालपण अमेरिकेत गेलं. सुरुवातीपासून तो अभ्यास हुशार होता. शालेय जीवनात कम्प्युटर आणि कोडिंगमध्ये त्याला आवड निर्माण झाली होती. गणितात तो हुशार होता, त्यामुळे त्याने SAT मॅथेमॅटिक्स लेव्हर - २ च्या परीक्षेत ८०० पैकी ८०० गूण मिळवले. यानंतर सर्वात प्रतिष्ठित तंत्रज्ञानाच्या संस्थांपैकी एक एमआयटीमधून कम्पुटर सायन्सचं शिक्षण घेतलं. एमआयटीमध्ये शिक्षण घेत असताना त्याने काही मित्रांसोबत मिळून Cursor ची सुरुवात केली. अभ्यासासह अमन खेळात सक्रिय होता आणि स्क्वॅश हा त्याचा आवडता खेळ होता. 

Cursor चा उद्देश डेव्हलपर्सची उत्पादता वाढवणं हा होता. कंपनीने असा एक एआय टूल तयार केला जो प्रोग्रॅमिंगदरम्यान सल्ला देतो, चुका ओळखतो आणि कोडिंग आधीपेक्षा अधिक सोपं करतो. याच कारणामुळे त्याचा स्टार्टअप कमी काळात लोकप्रिय झाला आणि त्याने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित केला. 

आता SpaceX द्वारा केलेल्या या मोठ्या अधिग्रहणानंतर अमन सांगरची संपत्ती अरब डॉलरमध्ये होण्याची आशा आहे. रिपोट्सनुसार, Cursor मध्ये त्याचा सहभाग तब्बल ४.५ टक्के आणि डीलनंतर त्याची एकूण संपत्ती कित्येक अरब डॉलरच्या घरात पोहोचू शकते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com