जाहिरात

SpaceX Starship: एलॉन मस्क यांना मोठा धक्का, स्टारशिप रॉकेट क्रॅश; अवकाशातच जळून नष्ट

SpaceX Starship: एलॉन मस्क यांना मोठा धक्का, स्टारशिप रॉकेट क्रॅश; अवकाशातच जळून नष्ट

जगाला अंतराळाबाबत मोठं स्वप्न दाखवणाऱ्या एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. स्पेसएक्स स्टारशिप रॉकेटचा चाचणी उड्डाणादरम्यान संपर्क तुटला. त्यानंतर ते रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले आणि अवकाशात जळून नष्ट झाले. आज आज 28 मे, गुरुवारी याची चाचणी करण्यात आली होती. लॉन्चच्या काही मिनिटानंतर स्टारशिपचं इंजिन बंद झालं. ज्यानंतर रॉकेटचे तुकडे आगीच्या गोळ्यांप्रमाणे दक्षिण फ्लोरिडा आणि बहामासच्या आकाशातून कोसळताना दिसले. कंपनीच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे. 

उड्डाणादरम्यान नियंत्रण गमावलं...

स्टारशिपने गुरुवारी टेक्सासमधून उड्डाण घेतलं होतं. लॉन्च आणि सुरुवातीचा टप्पा सुरक्षित होता. मात्र यानंतर रॉकेटचं नियंत्रण गमावलं आणि शेवटी रॉकेटशी संपर्क तुटला. स्पेसएक्सने सांगितलं की, उड्डाणादरम्यान स्टारशिप रॅपिड अनशेड्यूल्ड डिसएसेम्बली म्हणजे अचानक वेगळं झालं. 

भारतात तयार केलेले iPhone अमेरिकेत विकले तर याद राखा! Apple ला 25 टक्के टॅरीफची धमकी

नक्की वाचा - भारतात तयार केलेले iPhone अमेरिकेत विकले तर याद राखा! Apple ला 25 टक्के टॅरीफची धमकी

अमेरिकेतील विमानतळांना अलर्ट...

स्टारशिप रॉकेट आकाशात क्रश झालं. त्याच्या शिल्लक राहिलेल्या ढिगाऱ्याचा धोका लक्षात येता अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन एडमिनिस्टेशन एफएएने मियामी, फोर्ट लॉडरडेल, पाम बीच आणि ऑरलँडो विमानतळावरील उड्डाणं काही काळासाठी थांबवली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी सायंकाळी 8 वाजेपर्यंत विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे. 

या मिशनवर नासा लक्ष्य ठेवून आहे. भविष्यात चंद्रावर अंतराळातील पर्यटनांना पाठविण्यासाठी या स्टारशिपचा वापर करण्यास इच्छुक आहे. स्टारशिपची ही नववी चाचणी होती. यापूर्वी जानेवारी महिन्यात झालेल्या टेस्टमध्ये रॉकेट उड्डाणाच्या काही वेळातच कोसळला होता. स्पेसएक्सचं म्हणणं आहे की, प्रत्येक अयशस्वी चाचणीतून शिकायला मिळतं. यातून स्टारशिप अधिव विश्वासार्ह होण्यास मदत होईल.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com