एका कैचीमुळे खोळंबा; 36 उड्डाणे रद्द, 200 हून अधिक उशीराने, नेमकं काय घडलं?

विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या.  अनेक प्रवाशांना विमानतळावरुन माघारी फिरावं लागलं. ज्या प्रवाशांनी विमान प्रवास केला, त्यांचा देखील मोठा खोळंबा झाला. सोशल मीडियावर प्रवाशांना आपलेल्या झालेल्या मनस्तापाबद्दल संताप व्यक्त केला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

36 उड्डाणे रद्द, 200 हून अधिक उड्डाणे उशीराने, प्रवाशांचा खोळंबा, अनेक प्रवाशांना माघारी फिरावं लागलं. हे सगळं जपानमधील सर्वात मोठ्या, सर्वात व्यस्त अशा न्यू चिटोस विमानतळावर घडलंय. या सर्वासाठी निमित्त ठरलीय फक्त एक कैची. या घटनेची चर्चा जपानच नाहीतर संपूर्ण जगभरात सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झालं असं की, न्यू चिटोस विमानतळामधील एका रिटेल शॉपमधून एक कैची गायब झाली होती. ज्यानंतर विमानतळ प्रशासनाने हे प्रकरण सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानत तातडीने तपास सुरु केला. या घटनेनंतर विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली. सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण विमानतळाची शोध मोहीम सुरु केली. यावेळी विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली. ज्यामुळे विमानतळावर मोठी गर्दी जमा झाली. 

विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या.  अनेक प्रवाशांना विमानतळावरुन माघारी फिरावं लागलं. ज्या प्रवाशांनी विमान प्रवास केला, त्यांचा देखील मोठा खोळंबा झाला. सोशल मीडियावर प्रवाशांना आपलेल्या झालेल्या मनस्तापाबद्दल संताप व्यक्त केला. 

नक्की वाचा - महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?

शोध मोहिमेनंतर कैची त्याच दुकानात आढळली. मात्र सुरक्षा यंत्रणांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत सापडलेली कैची तीच आहे का हे देखील तपासून पाहिलं. ही घटना विमान हायजॅक आणि दहशतवादी हल्ला या दोन्ही दृष्टीने पाहिली गेली. ज्यामुळे यंत्रणांना वेळ घेऊन सविस्तर तपास केला. 

Advertisement

(नक्की वाचा-  Inspirational Story : सायकलही चालवता येत नव्हती, आता बनली कॅब ड्रायव्हर; परिस्थितीने सगळं शिकवलं)

कैची सापडल्याच्या घोषणाही प्रशासनाने उशीरा केली. परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने विमानतळ प्रशासनाला ही घटना पुन्हा घडू नये, यासाठी चौकशी करण्यास सांगितले. विमानतळाने प्रशासनाने एका निवेदनात म्हटले की ,"स्टोअरमधील खराब व्यवस्थापनामुळे ही घटना घडली आहे. आम्हाला भीती होती की ही अपहरण किंवा दहशतवादाशी संबंधित समस्या असू शकते. पुन्हा एकदा आम्ही व्यवस्थापन सुधारण्यासाठी पूर् क्षमतेने काम करू."

Advertisement
Topics mentioned in this article