इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्यासाठी रेड कार्पेटवर गुडघे टेकताना दिसत आहेत.
एडी रामा दोन्ही हात जोडून नमस्काराच्या पोझमध्ये गुडघ्यावर बसतात आणि मेलोनी समोरून येत आहेत. एडी रामाजवळ पोहोचल्यानंतर मेलोनी हसतात. त्यानंतर दोन्ही दोन्ही हस्तांदोलन करुन एकमेकांना मिठी मारतात आणि एकत्र फोटोशूट करतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अल्बेनियाची राजधानी तिराना येथे सुरू असलेल्या युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेत हा सगळा प्रकार घडला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिराना येथे आल्यावर, यजमान देश अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वांसमोर रेड कार्पेटवर गुडघे टेकले.