America china Trade Deal : अमेरिका-चीन यांच्यात मागील अनेक दिवसांपासून व्यापार युद्ध सुरु आहे. अमेरिका-चीन यांच्यात सुरु असलेल्या या व्यापार युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. या व्यापार युद्धादरम्यान अमेरिका आणि चीनने व्यापार करार केल्या माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी या व्यापार कराराची माहिती दिली आहे. स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं की, "मला हे सांगताना आनंद होत आहे की अमेरिका आणि चीनमधील अत्यंत महत्त्वाच्या व्यापार वाटाघाटींमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. स्विस सरकारने आम्हाला ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी खूप मदत केली आहे.
(नक्की वाचा - India Pakistan Tension: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी, मोदी निर्णय घेणार?)
स्कॉट बेसंट पुढे म्हणाले की, याबाबत सविस्तर तपशील आम्ही उद्या देऊ. अमेरिक आणि चीन यांच्यातील चर्चा फलदायी होती. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो, तसेच राजदूत जेमीसन यांच्याशीही बोललो आहे. त्यांना काय चालले आहे याची पूर्ण जाणीव आहे. म्हणून, उद्या सकाळी संपूर्ण माहिती दिली जाईल.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर यांनी म्हटलं की, किती लवकर एकमत होऊ शकले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यावरून असे दिसून येते की कदाचित फरक विचाराइतके मोठे नव्हते. असं असलं तरी, या दोन दिवसांत बरीच तयारी करण्यात आली.
(नक्की वाचा - India Pakistan Tension : कुटुंबातील प्रत्येक पुरुष ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर; प्रज्ज्वलदेखील लग्नानंतर भुजला रवाना)
अमेरिकेची व्यापार तूट 1.2 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. म्हणून राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि शुल्क लादले. आम्हाला विश्वास आहे की आमच्या चिनी भागीदारांसोबत आम्ही केलेला करार आम्हाला त्या राष्ट्रीय आणीबाणीचे निराकरण करण्यासाठी काम करण्यास मदत करेल, असं जेमिसन ग्रीर यांनी म्हटलं.