जाहिरात

Anil Ambani अनिल अंबानी आणि कुप्रसिद्ध जेफरी एपस्टीनचे चॅट लीक; स्वीडिश मुलीच्या ऑफरवर उद्योगपतीची प्रतिक्रिया

Anil Ambani and Jeffrey Epstein Leaked Chats: भारतीय उद्योगपती अनिल अंबानी आणि कुप्रसिद्ध अमेरिकन फायनान्सर जेफरी एपस्टीन यांच्यातील धक्कादायक संवादाचे काही खुलासे उघड झाले आहेत.

Anil Ambani अनिल अंबानी आणि कुप्रसिद्ध जेफरी एपस्टीनचे चॅट लीक; स्वीडिश मुलीच्या ऑफरवर उद्योगपतीची प्रतिक्रिया
Anil Ambani : , या प्रकरणावर अनिल अंबानी यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मुंबई:

Anil Ambani and Jeffrey Epstein Leaked Chats: भारतीय उद्योगपती अनिल अंबानी आणि कुप्रसिद्ध अमेरिकन फायनान्सर जेफरी एपस्टीन यांच्यातील धक्कादायक संवादाचे काही खुलासे उघड झाले आहेत. अमेरिकन न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली असून यामध्ये 2017 ते 2019 या कालावधीत दोघांमध्ये झालेल्या मेसेजवरील संभाषणाचा तपशील देण्यात आला आहे. या संभाषणात जागतिक मुद्दे आणि व्यापारासोबतच महिलांविषयी देखील चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार, या दोघांनी वैयक्तिक भेटींचे नियोजनही केले होते.

काय आहे प्रकरण?

या कागदपत्रांनुसार 9 मार्च 2017 रोजी झालेल्या संवादात अनिल अंबानी यांनी एपस्टीनला विचारले की, तू कोणाची शिफारस करतोस? त्यावर एपस्टीनने उत्तर दिले की, एक उंच आणि गोरी स्वीडिश मुलगी, जेणेकरून भेट अधिक मजेशीर होईल. या मेसेजला अवघ्या 20 सेकंदांच्या आत उत्तर देताना अनिल अंबानी यांनी त्याचे नियोजन कर, असे सांगितले होते. 

याशिवाय, एका संवादात एपस्टीनने अनिल अंबानींना त्यांच्या आवडीच्या अभिनेत्री किंवा मॉडेलबद्दल विचारले होते. त्यावर अंबानी यांनी स्कारलेट जोहानसनचे नाव घेतले होते. विशेष म्हणजे त्याच वर्षी रिलायन्स एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या एका चित्रपटात या अभिनेत्रीने काम केले होते.

( नक्की वाचा : हातात बंदूक, चेहऱ्यावर हसू! पाकिस्तानी सैन्याला भिडणाऱ्या 'त्या' तरुणीचा शेवटचा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO )

पॅरिस आणि न्यूयॉर्कमधील भेटींचे नियोजन

अंबानी आणि एपस्टीन यांच्यातील मेसेजमधून असेही समोर आले आहे की, त्यांनी पेरिसमध्ये भेटण्याबाबत चर्चा केली होती, मात्र ती भेट होऊ शकली नाही. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवरही त्यांनी चर्चा केली होती. 

मे 2019 मध्ये जेव्हा अनिल अंबानी न्यूयॉर्कमध्ये जाणार होते, तेव्हा एपस्टीनने त्यांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. मॅनहट्टन येथील एपस्टीनच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाल्याची पुष्टी त्यांच्या सहायकांनी केली आहे. मात्र, या प्रकरणावर अनिल अंबानी यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )

पुस्तकांमधून झाली ओळखीची सुरुवात

एपस्टीनला अंबानी कुटुंबाबद्दलची माहिती 2017 मध्ये त्याने मागवलेल्या काही डिजिटल पुस्तकांमुळे मिळाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याने अंबानी अँड संस आणि स्टॉर्म्स इन द सी विंड ही पुस्तके वाचली होती, ज्यातून त्याला या कुटुंबाचा इतिहास आणि त्यांच्या सामाजिक स्थानाची कल्पना आली होती. 

धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात व्यवसायाची फाळणी झाली होती. सध्या अनिल अंबानी रिलायंस समूहाचे अध्यक्ष आहेत, तर मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीजचे नेतृत्व करत असून ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ

गेल्या काही वर्षांत अनिल अंबानी यांच्या आर्थिक स्थितीत मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी अब्जाधीश असलेल्या अंबानींची बहुतांश संपत्ती आता संपली आहे. 2019 मध्ये मुकेश अंबानी यांनी 80 दशलक्ष डॉलरचे कर्ज फेडल्यामुळे अनिल अंबानी तुरुंगात जाण्यापासून वाचले होते. 

सध्या त्यांच्यावर विविध तपास यंत्रणांची चौकशी सुरू आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांना अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित 400 अब्ज रुपये म्हणजेच 4.4 अब्ज डॉलरच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या चौकशीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com