बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Prime Minister Sheikh Hasina) यांनी त्यांचं निवास्थान सोडलं आहे. शेख हसीना सुरक्षित स्थळी रवाना झाल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी AFP या न्यूज एजन्सीला दिली आहे.
शेख हसीना यांना घर सोडण्यापूर्वी भाषण रेकॉर्ड करायचं होतं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उज-जमान हे देशाला संबोधित करण्यापूर्वीच शेख हसीना सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. शेख हसीना यांनी त्यांचं निवासस्थान सोडताच आंदोलक त्यांच्या घरात दाखल झाले आहेत.
देशात गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामध्ये 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
शेकडो आंदोलनकांनी संचारबंदीचं उल्लंघन करुन राजधानी ढाकामधील रस्त्यांवर मोर्चा काढला. देशभरातून होत असलेल्या वाढत्या विरोधामुळेच शेख हसीना यांनी हा निर्णय घेतला असं मानलं जात आहे.
बांगलादेशमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसंच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी भारतीय उच्चायुक्तालयातील +8801958383679, +8801958383680, +8801937400591 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world