बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 'ढाका पॅलेस' सोडलं, PM निवासात आंदोलक घुसले

जाहिरात
Read Time: 2 mins
Sheikh Hasina : शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी बांगलादेशमध्ये आंदोलन सुरु आहे.
मुंबई:

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Prime Minister Sheikh Hasina) यांनी त्यांचं निवास्थान सोडलं आहे. शेख हसीना सुरक्षित स्थळी रवाना झाल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी AFP या न्यूज एजन्सीला दिली आहे.

'शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं 'गणभवन' (पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान) सोडलं असून त्या सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत,' अशी माहिती या सूत्रांनी AFP ला दिली. शेख हसीना यांनी निवासस्थान सोडल्यानं त्या लवकरच राजीनामा देतील अशी चर्चा आहे. 

शेख हसीना यांना घर सोडण्यापूर्वी भाषण रेकॉर्ड करायचं होतं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उज-जमान हे देशाला संबोधित करण्यापूर्वीच शेख हसीना सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. शेख हसीना यांनी त्यांचं निवासस्थान सोडताच आंदोलक त्यांच्या घरात दाखल झाले आहेत.

देशात गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामध्ये 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. 

( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
 

शेकडो आंदोलनकांनी संचारबंदीचं उल्लंघन करुन राजधानी ढाकामधील रस्त्यांवर मोर्चा काढला. देशभरातून होत असलेल्या वाढत्या विरोधामुळेच शेख हसीना यांनी हा निर्णय घेतला असं मानलं जात आहे. 

Advertisement

बांगलादेशमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसंच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी भारतीय उच्चायुक्तालयातील +8801958383679, +8801958383680, +8801937400591 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.