South Korea Plan Crash: दोन दिवसांपूर्वी रशियाच्या अझरबैजानमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एका विमान दुर्घटनेची बातमी समोर आली असून यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियामध्ये हा मोठा विमान अपघात झाला आहे.
South Korea Plane Accident : लँडींगदरम्यान झालेल्या अपघातात 28 जणांचा मृत्यू#SouthKoreaPlaneCrash #southkorea #ndtvmarathi pic.twitter.com/7ogurH3FM9
— NDTV Marathi (@NDTVMarathi) December 29, 2024
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण कोरियामधून एक मोठी विमान दुर्घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, जेजू एअर फ्लाइट 2216 मध्ये 181 लोक होते, ज्यापैकी 28 जणांचा दुर्दैवी अंत झाला. धावपट्टीवर उड्डाण घेत असतानाच विमान कोसळल्याने ही घटना घडली. या भयंकर अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
रविवारी बँकॉकहून येणारे विमान दक्षिण कोरियाच्या जिओला प्रांतातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. विमान धावपट्टीवरून घसरले आणि समोरील गेटवर कोसळले, त्यामुळे विमानाने पेट घेतला. या विमानात एकूण 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. ज्यापैकी 28 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या भयंकर विमान अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओही आता समोर आला आहे. दरम्यान, अपघातानंतर दक्षिण कोरियाच्या बचाव पथकाने 2 जणांना वाचवले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे. देशाचे कार्यवाहक अध्यक्ष चोई सुंग-मोक यांनी सरकारी यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या असून तातडीने मदतकार्य सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world