जाहिरात

India - Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मनात भारताबाबत इतकं विष का आहे? समजून घ्या खरं कारण

India Canada Relation :कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो हे नेहमीच भारतविरोधी राहिले आहेत. ते 2018 साली भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खलिस्तानी समर्थकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

India - Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मनात भारताबाबत इतकं विष का आहे? समजून घ्या खरं कारण
मुंबई:

India Canada Relation : कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद वाढत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. भारतानं कॅनडाच्या राजदूतांसह सहा अधिकाऱ्यांना वापस जाण्याचा आदेश दिला आहे. खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) निज्जरच्या हत्येनंतर हा वाद सतत वाढत आहे. अर्थात कॅनडामधील अंतर्गत राजकारण हे याचं मुळ कारण आहे. या राजकारणाचे शिल्पकार कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (justin trudeau) आहेत. ते देशांतर्गत राजकारणातील स्वत:चं स्थान मजबूत करण्यासाठी भारत विरोध आणि खलिस्तानींना पाठिंबा देण्याचा राग आळवत आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ट्रूडोंची लोकप्रियता घसरली

कॅनडाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जस्टीन ट्रूडोची लोकप्रियता घसरली आहे. काही स्थानिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झालाय. पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ट्रूडो यांना त्यांची लोकप्रियता परत मिळवायची आहे. कॅनडामधील अधिकृत आकडेवारीनुसार देशात 2.1 टक्के शिख लोकसंख्या आहे. कोणत्याही निवडणुकीत 2-3 टक्के मतं निर्णायक ठरु शकतात. 

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचा मॉन्ट्रिनयलमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर जगमीत सिंह यांच्या न्यू डेमोक्रेटिक पार्टीनं लिबरल पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे कॅनडाच्या राजकारणात भूकंप झाला. हा पक्ष खलिस्तानी समर्थक मानला जातो. 

भारतविरोधी इतिहास

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो हे नेहमीच भारतविरोधी राहिले आहेत. ते 2018 साली भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खलिस्तानी समर्थकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. भारतविरोधी शक्तींशी उघडपणे हातमिळणी केलेल्या अजेंड्याशी सहमत असलेले नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भारतविरोधी वक्तव्य केलं आहे.

आज गांधीजी असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबलं असतं का? वाचा AI नं काय दिलं उत्तर

( नक्की वाचा :  आज गांधीजी असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबलं असतं का? वाचा AI नं काय दिलं उत्तर )

कोण होता निज्जर?

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. निज्जर हा भारतीय तपास यंत्रणा एनआयएनं (NIA) अनेक गुन्हे दाखल केले होते. तो 'सिख्स फॉर जस्टिस' या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख सदस्य होता. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'त्यानं अनेकदा कॅनडामध्ये भारतविरोधी निदर्शनं आयोजित केले होते. भारतीय कुटनैतिक अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली होती. त्यानं कॅनडामधील स्थानिक गुरुद्वारानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून भारतीय अधिकाऱ्यांना बंदी घालावी असं आवाहन केलं होतं.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com