China Floods: महापुरासोबतच सापांचे थैमान! कोब्रासह 900 हून अधिक विषारी साप शहरात घुसले; VIDEO व्हायरल

China Floods: पुराच्या पाण्यात साप प्रजननाचे फॉर्म्स वाहून गेल्यामुळे तब्बल 900 हून अधिक विषारी साप आणि कोब्रा शहरात घुसले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सध्या चीनमधील अनेक प्रांतांना मुसळधार पाऊस आणि विनाशकारी महापुराने झोडपून काढले आहे. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असतानाच, गुआंग्शी प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक परिस्थिती समोर आली आहे. या भागात पूर आल्यामुळे सापांच्या ब्रीडिंग फार्म्समधून शेकडो विषारी साप आणि कोब्रा थेट रहिवासी भागात आणि पुराच्या पाण्यात मोकळे सुटले आहेत. 

चीनी माध्यमांच्या अहवालानुसार, सध्या किमान 900 हून अधिक विषारी साप शहरात असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. सापाने दंश केल्यामुळे आणि उपचारास उशीर झाल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Advertisement

थरारक व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर या घटनेचे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये कंबरभर पाण्यातून लोक वाट काढत असतानाच, त्यांच्या बाजूने महाकाय आणि विषारी साप पोहताना दिसत आहेत. काही धाडसी नागरिक या सापांना पकडण्याचा प्रयत्न करतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

(नक्की वाचा-  Nashik News: बेल्ट, पाईपने मारहाण, अंगावर चटके; आईकडून लिव्ह इन पार्टनरच्या मदतीने मुलांचा छळ

पारंपरिक औषधांसाठी 3 कोटी सापांचे संगोपन

गुआंग्शी हा चीनमधील व्यावसायिक साप पालनाचा सर्वात मोठा केंद्र मानला जातो. येथे पारंपरिक चिनी औषधे, चामड्याच्या वस्तू आणि मांसासाठी तब्बल 3 कोटी सापांचे संगोपन केले जाते. मात्र, हेंगझोऊ भागातील अनेक गावे पाण्याखाली गेल्याने हे फार्म्स उद्ध्वस्त झाले आणि साप थेट बाहेर पडले.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: एक सल्ला जीवावर बेतला! अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या)

प्राणीसंग्रहालयातून प्राणीही गायब

चीनच्या प्रादेशिक प्रचार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या विनाशकारी वादळ आणि पुरामुळे आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1.30 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सापांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि सर्पदंश झालेल्यांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी तात्पुरते वैद्यकीय दवाखाने सुरू केले आहेत. तसेच, तज्ज्ञांची पथके साप पकडण्यासाठी तैनात केली आहेत.
 


Topics mentioned in this article